JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Lake Of Horror: तलावातील हंस-बदल निर्दयीपणे मारले, माथेफिरूची शोधमोहीम सुरू

Lake Of Horror: तलावातील हंस-बदल निर्दयीपणे मारले, माथेफिरूची शोधमोहीम सुरू

ब्रिटनमधील (Britain) एका तलावातील (Lake) सुंदर असे बदक (Duck), हंस (Swan) आदी पक्षी (Birds) मृत्युमुखी पडल्याचं निदर्शनास आलं आहे. या सुंदर पक्षांची माथेफिरू अज्ञात सीरियल किलरनं हत्या केल्याचा आरोप प्रसिद्ध वन्यजीव कार्यकर्त्या कार्ली अ‍ॅलन यांनी केला आहे.

जाहिरात

Carley Ahlen, फोटो सौजन्य- डेली स्टार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 20 जानेवारी: ब्रिटनमध्ये एका अज्ञात सीरियल किलरची जोरदार चर्चा आहे. ब्रिटनमधील (Britain) एका तलावातील (Lake) सुंदर असे बदक (Duck), हंस (Swan) आदी पक्षी (Birds) मृत्युमुखी पडल्याचं निदर्शनास आलं आहे. या सुंदर पक्षांची माथेफिरू अज्ञात सीरियल किलरनं हत्या केल्याचा आरोप प्रसिद्ध वन्यजीव कार्यकर्त्या कार्ली अ‍ॅलन यांनी केला आहे. कार्ली यांनी याबाबत तक्रार नोंदवली आहे. आग्नेय लंडनमधील एक तलाव सध्या जोरदार चर्चेत आला आहे. हा तलाव ‘लेक ऑफ हॉरर’ (Lake Of Horror) या नावानं ओळखला जाऊ लागला आहे. अर्थात त्यामागे कारणही तितकंच भीषण आहे. या तलावातील सुंदर अशा चार बदकं आणि हंसांची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे. प्रसिद्ध वन्यजीव कार्यकर्त्या कार्ली अ‍ॅलन यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत, तक्रार दाखल केली आहे. ‘एका अज्ञात सीरियल किलरचं हे कृत्य असून, आपण किती निर्दयी आहोत, हे तो सिद्ध करत आहे’, असं कार्ली अ‍ॅलन यांनी म्हटलं आहे. ‘संरक्षित प्रजातीच्या पक्ष्यांची शिकार करणं, हा इंग्लंडमध्ये मोठा गुन्हा आहे. एकीकडे वन्यजीवांवरील हल्ले कमी होत आहेत, मात्र दुसरीकडे या घटनेमुळं मी पुरती हादरून गेले आहे. अशा पक्ष्यांना मारुन कोणतं समाधान मिळतं हे मला अद्याप समजलेलं नाही. मला हंस खूप आवडतात, त्यांना अशा अवस्थेत पाहणं माझ्यासाठी वेदनादायी आहे’, असं कार्ली अ‍ॅलन यांनी म्हटलं आहे. हे वाचा- रात्री गर्लफ्रेंडसोबत करत होता असं काम; 21 वर्षीय धडधाकट तरुणाचा अचानक जीव गेला ‘या तलावातील सुंदर पक्ष्यांना कोणत्याही प्राण्यानं मारलं नसून, हे अज्ञात व्यक्तीचं कृत्य आहे. या तलावात आतापर्यंत चार पक्षांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले आहेत. एका हंसाचं तर निर्दयीपणे शीर कापून त्याचे तुकडे तलावातच टाकून देण्यात आले आहेत. फॉरेन्सिक एक्सपर्टसच्या म्हणण्याप्रमाणे मी तलाव आणि परिसरात शोधमोहीम राबवून काही पुरावे जमा केले आहेत. तसेच या विदारक घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत’, असं कार्ली अ‍ॅलन यांनी सांगितलं. हे वाचा- महिलेनं पतीलाच ऑनलाईन विकलं; जाहिरातीत लिहिलेला मजकूर वाचून व्हाल शॉक अ‍ॅलन यांनी त्यांच्या वन्यजीव फाउंडेशनच्या मदतीने तलावाच्या परिसरात सीसीटीव्ही (CCTV) बसवले असून, या सीरियल किलरला रंगेहाथ पकडण्यासाठी विशेष योजनादेखील तयार केली आहे. तसेच या घटनेचे व्हिडीओ देखील व्हायरल केले आहेत. पक्ष्यांच्या हत्येमुळं ब्रिटनमधील हा तलाव सध्या विशेष चर्चेत आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या