JOIN US
मराठी बातम्या / विदेश / साऱ्या जगापासून लपून 'किम जोंग' बनवत होता TikTok व्हिडीओ? वाचा काय आहे सत्य

साऱ्या जगापासून लपून 'किम जोंग' बनवत होता TikTok व्हिडीओ? वाचा काय आहे सत्य

किम कुठे आहेत याबाबत 20 दिवस कुणालाच काही माहीत नव्हतं. मात्र आता एका व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. पाहा या VIDEO मध्ये काय आहे.

जाहिरात

नॉर्थ कोरियाच्या जेलमधून पळून गेलेल्या एका महिलेनं किम जोंग उन यांच्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. किम जोंग उन मानवी मृतदेहांचा वापर खतांसारखा करत असल्याचं तिनं म्हटलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्योंगयोंग, 2 मे: उत्तर कोरियाचे हुकूमशहा सम्राट किम जोंग उन यांच्या प्रकृतीबद्दल अद्यापही गूढ कायम आहे.20 दिवसांपूर्वी किम जोंग यांना सार्वजनिक ठिकाणी पाहिले होते, त्यानंतर किम कुठे आहेत याबाबत कोणालाच काही माहिती नाही आहे. काही वृत्तसंस्थांनी किम कोमात असल्याचे तर काहींनी किम यांच्या मृत्यूच्याही बातम्या दिल्या. मात्र खरं अद्याप कोणालाही माहित नाही आहे. या सगळ्यात TikTokवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी किम जोंग जगापासून लपून टीकटॉक व्हिडीओ तयार करत असल्याची शक्यता वर्तवली आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती हुबेहुब किम जोंग यांच्यासारखी दिसते. मात्र या व्हायरल व्हिडीओमध्ये किम जोंग नाही तर त्यांच्या सारखा दिसणारा purinsyogun आहे. purinsyogun टीकटॉक युझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे या व्हिडीओमध्ये दिसणारा योगून अगदी किम जोंग यांच्यासारखा आहे. किम जोंग यांची नक्कलही करतो, त्यांच्याप्रमाणेच पेहराव करून व्हिडीओ शूट करतो. एवढेच नाही तर, purinsyogun आपल्या व्हिडीओमध्ये सतत लाल बटन दाबताना दिसतात. या लाल बटणाचा अर्थ आहे, मिसाइल बटन. किम जोंग यांची हुकुमशाही भीतीदायक असली तरी purinsyogun मात्र लोकांना हसवत आहे. वाचा- किम जोंग उननंतर कोण? उत्तर कोरियात ‘कहानी में ट्विस्ट’; सत्तासंघर्ष अटळ

@purinsyogun 世界チャンピオン目指すニダ✊ ##ぷりん将軍 ##ぱんち ##ボクシング ♬ Eye of the Tiger (From “Rocky Balboa”) - Mike J. Wallace

purinsyogun यांनी, मी किम जोंग. मी बरा आहे. धन्यवाद! असा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. मात्र हा व्हिडीओ फक्त purinsyogun यांनी सध्याच्या परिस्थितीनुसार तयार केला होता. वाचा- सन्पेन्स संपला! 21 दिवसांनंतर जगासमोर आले किम जोंग उन, पाहा PHOTO

@purinsyogun Urgent statement ♬ オリジナル楽曲 - ぷりん将軍

सन्पेन्स संपला! 21 दिवसांनंतर जगासमोर आले किम जोंग उन उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन (Kim Jong Un) गेल्या काही दिवसांपासून गायब झाले होते. त्यांबाबत अनेक वावड्या उठल्या होत्या. किम जोंग उन यांची प्रकृती बिघडल्यानं उपचार सुरू होते अशाही चर्चा समोर येत होती. शुक्रवारी तब्बल 21 दिवसांनंतर किम जोंग उन सर्वांसमोर आले आहेत. उत्तर कोरियाच्या सरकारी न्यूज एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार 21 दिवसांनंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात ते पहिल्यांदा दिसले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या