JOIN US
मराठी बातम्या / विदेश / हुकूमशाह किम जोंग कोरोनालाही घाबरेना; सैन्यदलाच्या भव्य कार्यक्रमामध्ये मास्कशिवाय शक्तीप्रदर्शन

हुकूमशाह किम जोंग कोरोनालाही घाबरेना; सैन्यदलाच्या भव्य कार्यक्रमामध्ये मास्कशिवाय शक्तीप्रदर्शन

या भव्य कार्यक्रमात तिथे उपस्थित असलेल्या एकाही व्यक्तीने मास्क घातला नव्हता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उत्तर कोरिया, 10 ऑक्टोबर : हुकूमशाह किम जोंग उन कायम विविध कारणांमुळे चर्चेत असतो. उत्तर कोरियामधील माहितीवर सेन्सॉरशीप असल्याकारणाने सर्वच बाबी उघड होत नाहीत. या देशात 10 ऑक्टोबर रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण देशाची त्याकडे नजर होती. या कार्यक्रमात केवळ किम जोमचं नाही तर त्यांनी सैन्याचं शक्तीप्रदर्शनही केलं. विशेष म्हणजे यादरम्यान किम चक्क भावुक झाले होते आणि त्यांनी देशाच्या जनतेला कोरोना व्हायरसची महासाथ रोखण्यासाठी धन्यवाद दिले. भयंकर अशा मिसाइल्स पसंत असलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग यांनी एक अत्यंत गात परमाणू मिसाइल तयार केली आहे, जी अमेरिकेतील कोणतंही शहर उद्ध्वस्त करू शकते. उत्तर कोरियाने मिसाइल तयार केल्याची बातमी अशावेळी समोर आली आहे, जेव्हा किम जोंग आणि पश्चिमी देशांमधील संवाद थांबला आहे. या मिसाइलचं नाव Hwasong-15 आहे. आणि किम जोंग उन यांनी हे सैन्यदलाच्या परेडमध्ये सहभागी करून घेतलं होतं. मात्र अद्याप याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. उत्तर कोरियामध्ये शनिवारी सत्ताधारी वर्कर्स पार्टीची 75 वी वर्धापनदिन साजरा केला होता. यादरम्यान किन जोंग ऊन यांच्या संपूर्ण सैन्याचं शक्तीप्रदर्शन पाहण्यात आलं. हे ही वाचा- चीनच्या उलट्या बोंबा! म्हणे, “आम्ही केलं सावध; जगात आधीच पसरला होता कोरोना” किम जोंग यांनी यादरम्यान दावा केला आहे की, देशात कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. या देशाने यापूर्वीही असाच दावा केला होता, मात्र मीडियाने हा दावा खोटा ठरवला होता. या कार्यक्रमातील सैन्याच्या परेडदरम्यान कोणीही मास्क घातल्याचे दिसले नाही. किम यांनी उत्तर कोरियावर लावलेले प्रतिबंध, टायफून सारख्या नैसर्गित संकट आणि जगभरात गोंधळ माजवणाऱ्या कोरोना व्हायरसच्या महासाथीमुळे आपलं आर्थिक विकासाचं वचन पूर्ण करू शकले नसल्याचं सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या