JOIN US
मराठी बातम्या / विदेश / कझाकिस्तान येतंय रुळावर, राष्ट्रपतींकडून नवा Action Plan, पंतप्रधानही ठरले

कझाकिस्तान येतंय रुळावर, राष्ट्रपतींकडून नवा Action Plan, पंतप्रधानही ठरले

कझाकिस्तानात नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात येत असून अर्थगाडा पुन्हा रुळावर आणण्याची घोषणा राष्ट्रपतींनी केली आहे. याशिवाय काही महत्त्वाच्या घोषणाही केल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नूर सुल्तान, 12 जानेवारी: गेल्या आठवड्याभरापासून आंदोलनामुळे (Agitation) होरपळणारं कझाकिस्तान (Kazakhstan) पुन्हा रुळावर येऊ (Back on Track) लागल्याचं चित्र आहे. कझाकिस्तानचे राष्ट्रपती टोकायेव (President Tokayev) यांनी नवा ऍक्शन प्लॅन (New Action Plan) जाहीर केला असून दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी आपण सज्ज असल्याचं म्हटलं आहे. कझाकिस्तानात झालेल्या आंदोलनामागे परकीय शक्तींचा हात होता, असा आरोप राष्ट्रपती टोकायेव यांनी केला आहे. रशियाच्या सैन्याच्या मदतीने सध्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून नव्यानं मंत्रिमंडळाची उभारणी होत आहे.   ठरले नवे पंतप्रधान नागरिकांच्या उठावानंतर कझाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधानांसह पूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा मंत्रिमंडळाची स्थापना करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अलिखान स्माईलोव्ह यांची पंतप्रधानपदी निवड कऱण्यात येत असल्याची घोषणा राष्ट्रपतींनी केली आहे. कझाकिस्तानच्या कनिष्ठ सभागृहाला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली. स्माईलोव्ह हे यापूर्वीच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते आणि उपपंतप्रधानही होते. कझाकिस्तानच्या कनिष्ठ सभागृहानं स्माईलोव्ह यांची पंतप्रधानपदी एकमतानं निवड केली आहे. सरकारचा नवा कृती कार्यक्रम तयार करून तो संसदेपुढे सादर करण्यासाठी त्यांना तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.   राष्ट्रपतींच्या मोठ्या घोषणा दहशतवाद्यांच्या पाठिंब्यानं होऊ घातलेला उठाव मोडून काढल्याचा दावा करतानाच राष्ट्रपती टोकायेव यांनी सरकारच्या आगामी योजनांची माहिती दिली आहे. त्यानुसार कझाकिस्तानची आर्थिक राजधानी अल्माटी आणि इतर शहरांचं झालेलं नुकसान भरून काढणे, इमारतींची पुनर्बांधणी करणे या कामांचा समावेश आहे. अर्थगाडा रुळावर आणणे, अन्नपुरवठा सुरळीत करणे आणि दळणवळणाच्या सुविधा पूर्ववत कऱणे या गोष्टींना अग्रकम देणार असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.   हे वाचा -

सध्या शांतता, पण… नागरिकांचे मोर्चे सध्या थांबले असून रशियाचं सैन्य रस्त्यावर आहे. त्यामुळे कझाकिस्तानमध्ये सध्या तरी शांतता आहे. मात्र दहशतवादी संधी शोधून पुन्हा गोंधळाची परिस्थिती निर्माण करू शकतात, याची आपल्याला जाणीव असून त्यासाठी आपण नेहमीच सज्ज असल्याचा दावा राष्ट्रपतींनी केला आहे. ज्यांचं ज्यांचं या आंदोलात आर्थिक नुकसान झालं असेल, त्यांना नुकसानभरपाई देण्याचं आश्वासनही सरकारच्या वतीनं राष्ट्रपतींनी दिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या