JOIN US
मराठी बातम्या / विदेश / 'सैन्य वापसीचा निर्णय योग्यच; देशाला गरज असताना घनींनी अफगाणिस्तानातून पळ काढला', बायडन यांची प्रतिक्रिया

'सैन्य वापसीचा निर्णय योग्यच; देशाला गरज असताना घनींनी अफगाणिस्तानातून पळ काढला', बायडन यांची प्रतिक्रिया

जो बायडन यांनी अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा आणि अमेरिकन सैन्य बाहेर काढण्याच्या मुद्द्यावर देशाला संबोधित (Joe Biden On Afghanistan Crisis) केले. बायडन म्हणाले की, अमेरिकेचं अफगाणिस्तानमधील युद्ध संपवण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल मला कोणताही खेद नाही.

जाहिरात

File Photo

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन 17 ऑगस्ट : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सोमवारी रात्री उशिरा अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा आणि अमेरिकन सैन्य बाहेर काढण्याच्या मुद्द्यावर देशाला संबोधित (Joe Biden On Afghanistan Crisis) केले. अफगाण नेतृत्वावर खापर फोडत बायडन म्हणाले की, अफगाणी नेते आपल्या लोकांच्या भल्यासाठी एकत्र येण्यात अपयशी ठरले आहेत. जेव्हा सर्वात जास्त गरज होती तेव्हा ते आपल्या भविष्यासाठी उभा राहू शकले नाहीत. बायडन म्हणाले की, अमेरिकेचं अफगाणिस्तानमधील युद्ध संपवण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल मला कोणताही खेद नाही. (Taliban Regains Control on afghanistan) …तर पुन्हा Lockdown; निर्बंध हटवल्याच्या पहिल्याच दिवशी CM ठाकरेंनी दिला इशारा अमेरिकेचे अध्यक्ष पुढे म्हणाले, की “मला माहित आहे की या निर्णयामुळे माझ्यावर टीका केली जाईल, परंतु मी सर्व टीका स्वीकारतो. मी ती पुढच्या अध्यक्षांवर सोडू शकत नव्हतो. अफगाणिस्तानातून (Afghanistan Crisis Updates) बाहेर पडण्याची योग्य वेळ कधीच आली नसती. हे चार अध्यक्षांच्या कार्यकाळात चालत राहिलं आणि मी ते पाचव्यासाठी सोडू शकत नव्हतो. आपण आपल्या सैनिकांना अनंत काळासाठी दुसर्‍या देशाच्या नागरी संघर्षात ढकलू शकत नाही. आम्हाला हा निर्णय घ्यावाच लागणार होता. " खळबळजनक! मुंबईतील कोविड सेंटरमध्ये घुसला भलामोठा अजगर; पुढे काय घडलं पाहा राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात जो बायडन यांनी पुल आउट डीलसाठी माजी अध्यक्ष ट्रम्प यांना दोषी ठरवले. ते पुढे म्हणाले, “जर अफगणाचं सैन्य लढायला तयार नसेल तर अमेरिकींनाही तिथे आपला जीव गमावण्याची गरज नाही. आवश्यक असल्यास, आम्ही अफगाणिस्तानमधील दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करू. ” बायडेन म्हणाले, की 20 वर्षांपूर्वी आम्ही 11 सप्टेंबर 2001 च्या हल्लेखोरांना पकडण्याच्या उद्देशानं आम्ही अफगाणिस्तानात आलो. अफगाणिस्तानला तळ बनवून अल कायदा पुन्हा आपल्यावर हल्ला करू शकणार नाही याचीही आम्हाला खात्री करायची होती. आम्ही आमचे ध्येय साध्य करण्यात पूर्णपणे यशस्वी झालो आहोत. आम्ही अफगाणिस्तानातील अल कायदा नष्ट केला. आम्ही ओसामा बिन लादेनला शोधून मारले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या