JOIN US
मराठी बातम्या / विदेश / शाळा सुरू करणं 'या' देशाला पडलं महागात; 250 मुलं कोरोना संक्रमित, 6800 जण क्वारंटाइन

शाळा सुरू करणं 'या' देशाला पडलं महागात; 250 मुलं कोरोना संक्रमित, 6800 जण क्वारंटाइन

कोरोनाव्हायरसवर नियंत्रण मिळवणाऱ्या मोजक्याच देशांपैकी एक इज्राइल (Israel). मात्र एका निर्णयामुळे कोरोना संक्रमितांची संख्या अचानक वाढली.

जाहिरात

प्रातिनिधीक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जेरूसालेम, 04 जून : भारतातील काही राज्यांमध्ये शाळा (school) पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात. मात्र इज्राइलला  (Israel) हाच निर्णय महागात पडला आहे. कोरोनाव्हायरस (Coronavirus) नियंत्रणात असलेल्या काही मोजक्याच देशांपैकी एक देश इज्राइल. कोरोनाव्हायरसची प्रकरणं कमी होताच या देशाने शाळा सुरू केल्या आणि 261 जण कोरोना संक्रमित झालेत. त्यामुळे 6800 मुलांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. इज्राइलमध्ये मार्च महिन्यात कोविड-19 जास्त प्रकरणं आली. एप्रिलमध्ये ही प्रकरणं झपाट्याने वाढू लागली. त्यावेळी इज्राइलने टेस्टिंगसह लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. 30 एप्रिलला देशात 15,946 कोरोना रुग्ण होते. पुढील 15 दिवसात फक्त 600 प्रकरणं आली. त्यामुळे सरकारने उत्साहाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शाळा सुरू केल्या. शाळा सुरू करताच देशातील कोरोनाची प्रकरणं वाढली. हे वाचा -  मोठी बातमी! विद्यापीठाची परीक्षा 15 जुलैपासून?अमित देशमुखांची राज्यपालांशी चर्चा NPR  च्या वृत्तानुसार, इज्रायलच्या शाळेतील 261 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाली. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 261 कोरोना संक्रमितांमध्ये 250 मुलं आहेत. यानंतर 6800 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.  देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता  17,377 वर पोहोचली आहे. अचानक प्रकरणं वाढल्यानं इज्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी शाळा अनिश्चित काळापर्यंत बंद करण्याचे आदेश दिलेत. जोपर्यंत शाळेतील मुलं आणि कर्मचारी पूर्णपणे कोरोनामुक्त होत नाहीत तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत, असं पंतप्रधानांनी सांगितलं. हे वाचा -  आजही राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ, ओलांडली धोक्याची पातळी कोरोनाव्हायरसची सर्वाधिक प्रकरणं असलेल्या देशांच्या यादीत इज्राइल 42 व्या स्थानावर आहे. आतापर्यंत  14,993 कोरोना रुग्ण बरे झालेत. तर 2145 सक्रिय रुग्ण आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या