लंडन, 24 डिसेंबर: ब्रिटनमध्ये (Britain) कोरोना व्हायरसचा (Coronavirus) नवा प्रकार उघड आल्यानंतर अनेक देशांनी ब्रिटनशी असलेली वाहतूक सध्या बंद केली आहे. ब्रिटनच्या शेजारच्या फ्रान्सनंही (France) ब्रिटनची बॉर्डर सध्या बंद केली आहे. त्यामुळे हजारो ट्रक ड्रायव्हर दोन देशांच्या बॉर्डरवर अडकले आहेत. ब्रिटनमध्ये कडक निर्बंध लागू असल्यानं त्यांच्यासमोर रोजच्या जेवणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. ब्रिटनमध्ये फसलेल्या आणि खाण्याचे वांदे झालेल्या या हजारो ट्रक ड्रायव्हर्सच्या मदतीसाठी देशातील शीख समाज पुढे सरसावला आहे. या शीख बांधवांनी त्यांना गरमागरम जेवण पोहचवण्यासाठी पुढाकार घेतला. कोरोना काळात अनेक वाईट घटनांचा अनुभव जगानं घेतला आहे. प्रत्येकाचीच परीक्षा पाहणाऱ्या या काळातही माणुसकीचा धर्म जिवंत आहे, याचा जिवंत अनुभव या ट्रक ड्रायव्हर्सना यानिमित्तानं आला. (हे वाचा- धक्कादायक! आश्रमाबाहेर रात्रभर थांबली होती महिला, व्यवस्थापनाला फुटला नाही पाझर ) ब्रिटीश माध्यमांमध्ये याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शीख समुदायाच्या एका चॅरीटी ट्रस्टने बॉर्डरवरील कँपमध्ये अडकलेल्या जवळपास एक हजार ट्रक ड्रायव्हर्सना गरग-गरम छोले, चावल आणि मशरुम पास्ताचं जेवण दिले. त्याचबरोबर स्थानिक रेस्टॉरंटनं दिलेले पिझ्झाही या ड्रायव्हर्सना देण्यात आले. डॉमिनोज ढिल्लो ग्रुप या फ्रँचायझीकडून हे सर्व पिझ्झा देण्यात आले, अशी माहिती खालसा चॅरीटी ट्रस्टने दिली आहे.
दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये चर्चा फ्रान्समध्ये जाण्यासाठी जवळपास 1500 ट्रक सध्य ब्रिटनच्या बॉर्डरवर अडकल्या आहेत. त्यांच्यावरील निर्बंध उठवले नाहीत तर ब्रिटनमध्ये खाद्यपदार्थांची टंचाई जाणवू शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांच्याशी चर्चा केली. जॉन्सन यांनी यावेळी हे या निर्बंधामधून सूट देण्याती विनंती मॅक्रॉन यांना केली. (हे वाचा- Covid काळात हा HR मॅनेजर ठरला गरिबांसाठी सुपर हिरो! Rice ATM ने शेकडोंना आधार ) ट्रक ड्रायव्हर्सना ख्रिसमसचे वेध ‘ब्रिटन-फ्रान्स बॉर्डरवर अडकलेल्या सर्व ड्रायव्हर्सना आता ख्रिसमसाठी आपल्या घरी जाण्याचे वेध लागले आहेत. घराच्या काळजीनं यामधील काही ड्रायव्हर्स व्यथित झाले होते’, अशी माहिती त्यांना मदत पोहचवणाऱ्या स्थानिक स्वयंसेवकानं दिली.