JOIN US
मराठी बातम्या / विदेश / तुर्कीत चमत्कार! 21 दिवसांनी ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर आला घोडा, सगळेच अवाक्, पाहा VIDEO

तुर्कीत चमत्कार! 21 दिवसांनी ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर आला घोडा, सगळेच अवाक्, पाहा VIDEO

तुर्कस्तानमध्ये 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर अदियामनचे मोठे नुकसान झाले. या भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आतापर्यंत 48,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

जाहिरात

तुर्कीत चमत्कार!

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अदियामन, 28 फेब्रुवारी : या महिन्याच्या सुरुवातीला तुर्कीमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात हजारो लोक मृत्यूमुखी पडले. अगदी आठवड्यानंतरही लोक जीवंत बाहेर आले होते. मात्र, आता 21 दिवसांनी अदियामन शहरातील इमारतीच्या ढिगाऱ्यात एक घोडा जिवंत सापडला आहे. तानसू येगेन नावाच्या युजरने ट्विटरवर एक क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये स्वयंसेवकांची एक टीम हा घोडा ढिगाऱ्यातून काढताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले, ‘अद्भुत, अद्भुत, अद्भुत… अदियामनमध्ये भूकंपानंतर 21 दिवसांनी इमारतीच्या ढिगाऱ्यात जिवंत सापडलेल्या घोड्याला टीमने वाचवले.’

संबंधित बातम्या

तुर्कस्तानमध्ये 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर आदियमनला मोठा फटका बसला होता. हा भूकंप इतका तीव्र होता की त्याचे आफ्टरशॉक अजूनही जाणवत आहेत. येथे देशाच्या दक्षिणेकडील भागात सोमवारी 5.6 तीव्रतेचा भूकंप झाला, जो आफ्टरशॉक असल्याचे मानले जाते. वाचा  - जपानमध्ये सापडलेल्या मेटल बॉलचे रहस्य उलगडले, जाणून घ्या काय आहे सत्य या ताज्या भूकंपात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर आधीच जीर्ण झालेल्या काही इमारती जमीनदोस्त झाल्या. देशाच्या आपत्ती व्यवस्थापन एजन्सी एएफएडीचे प्रमुख युनूस सेझर यांनी सांगितले की, सोमवारी झालेल्या भूकंपाचे केंद्र मलात्या प्रांतातील येसिल्टर शहरात होते. या भूकंपात 69 लोक जखमी झाले, तर दोन डझनहून अधिक इमारती कोसळल्या. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे आतापर्यंत 48,000 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. 6 जानेवारीच्या शक्तिशाली भूकंपापासून, या प्रदेशात सुमारे 10,000 आफ्टरशॉक झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या