JOIN US
मराठी बातम्या / विदेश / हँड सॅनिटायजर पसरवतोय कॅन्सर; आढळले धोकादायक केमिकल्स, अभ्यासातून मोठा खुलासा

हँड सॅनिटायजर पसरवतोय कॅन्सर; आढळले धोकादायक केमिकल्स, अभ्यासातून मोठा खुलासा

जगभरात 44 हँड सॅनिटायजर असे आहेत, जे लोकांमध्ये कॅन्सर पसरवण्यास कारणीभूत ठरत आहेत. एका अभ्यासातून हा खुलासा करण्यात आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 मार्च : देशासह जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. या व्हायरसपासून (Coronavirus) स्वत:चा बचाव करण्यासाठी फेस मास्क, हँड सॅनिटायजर (Hand Sanitizer) आणि सोशल डिस्टन्सिंग हे महत्त्वाचे तीन प्रमुख उपाय आहेत. या काळात हँड सॅनिटायजरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. परंतु जगभरात 44 हँड सॅनिटायजर असे आहेत, जे लोकांमध्ये कॅन्सर पसरवण्यास कारणीभूत ठरत आहेत. एका अभ्यासातून हा खुलासा करण्यात आला आहे. न्यू हेवन स्थित ऑनलाईन फॉर्मेसी फर्म वॅलिजरने जगभरातील 260 हँड सॅनिटायजरचा अभ्यास केला आहे. यात असं आढळून आलं की, 44 हँड सॅनिटायजरमध्ये अशा केमिकलचा वापर होत आहे, जो माणसाच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. या केमिकलच्या सतत संपर्कात आल्याने, कॅन्सर होण्याचा धोका निर्माण होत आहे. या 44 हँड सॅनिटायजरमध्ये वापरण्यात येणारं केमिकल लोकांच्या त्वचेसाठी अतिशय धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

(वाचा -  तरुणांना कोरोना लस का दिली जात नाही? तज्ज्ञांनी सांगितलं कारण )

वॅलिजरने हा धोका पाहता चिंता व्यक्त केली असून अमेरिकी अन्न आणि औषध विभागाला (एफडीए) पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. पत्रात लिहिलंय की, कोरोनापासून वाचण्यासाठी जगभरात गेल्या वर्षभरापासून हँड सॅनिटायजरचा वापर वाढला आहे. अशात या हँड सॅनिटायजरबाबत केलेल्या अभ्यासात बेंजीनसह कॅन्सरचा धोका निर्माण करणारे अनेक धोकादायक केमिकल आढळले आहेत.

(वाचा -  Covid-19 Vaccination: लसीकरणासाठी घरबसल्या करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन; बुक करा स्लॉट )

बेंजीन आरोग्यासाठी धोकादायक आहे. बेंजीनच्या उच्च स्तराच्या संपर्कात आल्याने शरीरात रक्तपेशी योग्यरित्या काम करू शकत नाहीत. कधी-कधी लाल रक्तपेशी तयार होणंच बंद होतं किंवा व्हाईट ब्लड सेल्स कमी होऊ लागतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या