शाळेच्या हॉस्टेलला आग लागून भीषण दुर्घटना
जॉर्जटाऊन, 23 मे : गयानातील एका बोर्डिंग स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात आग लागून किमान 19 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अनेक विद्यार्थी आगीत होरपळले आहेत. मृतांमध्ये मुलींचा समावेश सर्वाधिक असून राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांनी ही घटना भयानक असल्याचं म्हटलं आहे. घटना भयानक, दु:खद आणि वेदनादायी आहे. सरकार जखमींवर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सरकारकडून सांगण्यात आले की, जॉर्जटाऊनपासून 320 किमी दूर अंतरावर असलेल्या महदिया शहरात एका शाळेच्या हॉस्टेलमध्ये भीषण आग लागली. माध्यमिक शाळेच्या या इमारतीला रात्री अकराच्या सुमारास आग लागली. या आगीचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. जॉर्जटाउन रुग्णालयाचे डॉक्टर विकिता नंदन यांनी सांगितलं की, मृतांमध्ये विद्यार्थीनींचा समावेश आहे. पाच वर्षांच्या एका मुलावर उपचार सुरू आहेत. एकूण १९ जणांचा मृत्यू झाला असून जखमींवर उपचार केले जात आहेत. मोती अन् जयाचा पासपोर्ट तयार, वाराणसीच्या गल्लीतून जाणार थेट परदेशात गयानाच्या अग्निशमन दलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तेव्हा हॉस्टेलची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. यात 14 विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर इतर पाच जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितलं दोन मुलांची प्रकृती गंभीर आहे. तर चार जण होरपळले आहेत. सहा विद्यार्थ्यांना उपचारासाठी विमानाने जॉर्जटाऊनला नेण्यात आलं आहे. आणखी पाच जणांवर महदियातील रुग्णालयात उपचार केले जात आहेत. इतर दहा जण डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार गेराल्ड गोविया यांनी सांगितलं की, शाळेत 12 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थी शिक्षण घेतात.