न्यूयॉर्क 10 जून: औषधं उत्पादन क्षेत्रातली दिग्गज अमेरिकन कंपनी असणाऱ्या Johnson & Johnson ने कोरोनावर औषध सापडल्याचा दावा केलाय. या औषधाच्या मानवी चाचण्या जुलै महिन्यात घेण्यात येतील असा दावा कंपनीने केला आहे. त्यासाठी कंपनीने अमेरिकन सरकारकडे परवानगीही मागितली आहे. त्याचबरोबर कंपनीने अमेरिकन सरकारसोबत एक करार केला असून औषध सिद्ध झालं तर कंपनी तब्बल 1 लाख बिलियन डोजेस तयार करणार आहे. कंपनी हा प्रयोग अमेरिका आणि बेल्जियममध्ये करणार असून त्यासाठी 1,045 जणांची निवड करण्यात आली आहे. त्यात 18 ते 65 या वयोगटातली माणसं निवडण्यात आली आहेत. जगभरात सध्या 10 कंपन्यांनी औषध शोधण्यात प्रगती केल्याचा दावा केला आहे. औषध शोधून त्याच्या मानवी चाचण्या सुरू केल्यानंतरही नियमित प्रक्रियेनुसार त्या औषधाचा शरिरावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी साधारणपणे 12 ते 18 महिन्यांचा कालावधी लागतो. यात आता सुट दिली जाणार आहे. सुरुवातीच्या अभ्यासानंतर त्यात यश मिळालं आणि त्याचे दुष्परिणाम आढळून आले नाहीत तर हे औषध कोरोना रुग्णांना दिलं जाऊ शकते. दिलासादायक! ‘या’ शहरात विकसित होतेय कोरोनाविरोधात हर्ड इम्युनिटी जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात कोरोनाव्हायरसने (coronavirus) आपले हातपाय पसरलेले आहेत. सर्वात जास्त कोरोनाव्हायरसची प्रकरणं असलेल्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे तर भारताचा (india) सहावा क्रमांक आहे. जगात आता असा कोणता देश आहे जो कोरोनाच्या संकटातही सुरक्षित (World Safest Country in Covid19) आहे, असा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडला आहे. तर त्याचं उत्तर आहे स्वित्झर्लंड. पहिल्या श्रेणीत जगातील सर्वात सुरक्षित 20 देशांचा समावेश आहे तर चौथ्या श्रेणीत सर्वाधिक धोका असलेले म्हणजे सर्वाधिक असुरक्षित देश आहेत. पहिल्या श्रेणीत स्वित्झर्लंड टॉपवर आहे. स्वित्झर्लंड हा जगातील सर्वात सुरक्षित देश असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. पोटात दुखायला लागलं म्हणून झाला अॅडमिट, X-ray रिपोर्टमध्ये दिसला जिवंत मासा तर सर्वात जास्त धोका असलेल्या तिसऱ्या श्रेणीत भारताचा समावेश आहे. या यादीत भारत 56 व्या क्रमांकावर आहे. सुदान हा सर्वात असुरक्षित देश असून सर्वात शेवटी म्हणजे 200 व्या स्थानी आहे अहवालानुसार जगातील सर्वात सुरक्षित 10 देश पहिल्या दहा देशांमध्ये स्वित्झर्लंड आणि जर्मनी अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. तर त्यानंतर इज्राइल, सिंगापूर, जपान, ऑस्ट्रिया, चीन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया यांचा क्रमांक लागतो. या सुरक्षित देशांच्या यादीत भारत अमेरिकेपेक्षा 2 क्रमांकाने वर 56 व्या स्थानी आहे.