JOIN US
मराठी बातम्या / विदेश / कोण म्हणतं फक्त माणसंच Driving करू शकतात? नव्या प्रयोगातून समोर आली Interesting माहिती

कोण म्हणतं फक्त माणसंच Driving करू शकतात? नव्या प्रयोगातून समोर आली Interesting माहिती

कोण म्हणतं फक्त माणसंच ड्रायव्हिंग करू शकतात? इस्रायलच्या शास्त्रज्ञांनी नुकताच नवा शोध लावला असून माणसांसोबत आता आणखी एक प्राणी ड्रायव्हिंग करू शकत असल्याचं सिद्ध केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

तेल अवीव, 10 जानेवारी: गोल्डफिश (Gold Fish) हे माणसाप्रमाणेच (Human Being) उतम ड्रायव्हिंग (Driving) करू शकतात, हे इस्त्रायलमधील (Israel Scientists) वैज्ञानिकांनी एका प्रयोगातून (Experiment) सिद्ध केलं आहे. केवळ कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष माशांना ड्रायव्हिंग करायला लावून आणि त्यांनी ड्रायव्हिंग टेस्ट घेऊन हे सिद्ध करण्यात आलं आहे. प्राणीशास्त्रातील एक मोठं संशोधन म्हणून याकडे पाहिलं जात आहे.   काय आहे प्रयोग? इस्त्रायलच्या बेन गुरियन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी गोल्ड फिश चालवू शकतील, असं एक वाहन तयार केलं. ही एक रोबोटिक कार होती आणि त्यात काही सेन्सर बसवण्यात आले होते. माशांना रस्ता दिसावा आणि माशांच्या मेंदूतील सिग्नल वाहनांतील सिस्टिमला मिळावा, अशी यंत्रणा यात फिट करण्यात आली होती.  

माशांनी दिला प्रतिसाद या प्रयोगानुसार माशांना ड्रायव्हिंग करण्यासाठी मोकळं सोडण्यात आलं. म्हणजेच जेव्हा जेव्हा मासे गाडीच्या स्टेअरिंगला स्पर्श करायचे, तेव्हा गाडी सुरु व्हायची. त्यामुळे आपण विशिष्ट कृती केली असता गाडीची विशिष्ट हालचाल होते, हे त्यांच्या लक्षात आलं आणि माशांनी वारंवार गाडी चालवायला सुरुवात केल्याचं दिसून आलं. कॉम्प्युटर, कॅमेरा आणि इलेक्ट्रिक मोटर यांच्या साहाय्यानं गाडी चालवण्याचा पूर्ण कंट्रोल हा माशांकडेच देण्यात आला होता.   माशांना दिलं टार्गेट एकाच वेळी 10 माशांवर हा प्रयोग करण्यात आला. माशांना गाडी चालवता येऊ लागल्यानंतर त्यांना टार्गेट देण्यात आले आणि जो मासा हे टार्गेट पूर्ण करेल, त्याला अमिष म्हणून खाद्यपदार्थ दिले जाऊ लागले. आपण आपल्याला दिलेलं उद्दिष्ट गाठलं की खाऊ मिळतो, हे माशांना समजलं आणि त्यांच्या कामगिरीत अधिकच सुधारणा झाल्याचं दिसून आलं.   हे वाचा -

शास्त्रज्ञांना वाटलं आश्चर्य मासे इतक्या पटकन ड्रायव्हिंग शिकतील, अशी शास्त्रज्ञांनाही अपेक्षा नव्हती. मात्र माशांनी दिलेला प्रतिसाद पाहता, माणसांप्रमाणे मासेदेखील दिशा ओळखू शकतात आणि हव्या त्या दिशेला वाहन नेऊ शकतात, हे प्रयोगातून सिद्ध झालं. या प्रयोगामुळे प्राणीशास्त्रातील काही मोठे शोध लागू शकतात आणि प्राण्यांच्या मेंदूवरील संशोधन अधिक विकसित होऊ शकतं, असं मानलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या