लाहोर, 30 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबाननं (Taliban) सत्ता प्रस्थापित केल्यानंतर पाकिस्तानला (Pakistan) आनंदाच्या उकळ्या फुटत असल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून आलं आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानात तालिबान सरकार येत असल्याच्या घटनेचं स्वागत तर केलं आहेच, शिवाय आता तालिबानला जगाने मान्यता द्यावी, यासाठीदेखील पुढाकार घ्यायला सुरुवात केल्याचं चित्र आहे. तालिबानला जगाने आणि विशेषतः पाश्चिमात्य देशांनी (western countries) लवकरात लवकर मान्यता (approval) द्यावी, अन्यथा आणखी एक 9/11 घडण्याची शक्यता (Possibility) नाकारता येत नाही, असं पाकिस्ताननं म्हटलं आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईंद युसूफ (Moind Yusuf) यांनी संडे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत हा इशारा दिला आहे. काय म्हणाले मोईंद युसूफ पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईंद युसूफ यांची पत्रकार क्रिस्टिना लॅम्ब यांनी मुलाखत घेतली. त्यातील एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी तालिबान सरकारला पाश्चिमात्य देशांनी लवकरात लवकर मान्यता देण्याची गरज व्यक्त केली आहे. तसं झालं नाही, तर पुन्हा एकदा 11 सप्टेंबर 2001 साली घडला तसा प्रसंग घडू शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे. दबावानंतर घूमजाव ही बातमी छापून आल्यानंतर जगभरातून येणाऱ्या संतप्त प्रतिक्रियानंतर पाकिस्ताननं घूमजाव केलं आहे. तालिबान सरकारला मान्यता दिली नाही, तर 1990 च्या दशकातील परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते, असं आपल्याला म्हणायचं होतं. मात्र संडे टाईम्सच्या वृत्तात आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे वाचा - प्रियकराच्या वागणुकीला वैतागून घरात लावला CCTV;1 तासाच्या आत भयावह Video रेकॉर्ड संडे टाईम्स ठाम संडे टाईम्सनं ही मुलाखत सुधारित स्वरुपात छापावी, अशी सूचना लंडनमधील पाकिस्तानच्या दूतावासानं एक पत्र पाठवून संडे टाईम्सला केली. मात्र या मुलाखतीत काहीही बदल करायला संडे टाईम्सनं नकार दिला आहे. ही मुलाखत रेकॉर्डवर घेण्यात आली असून त्याच्या ऑडिओ क्लिप्स आपल्याकडे असल्याचा दावा संडे टाईम्सनं केला आहे. या विधानामुळे आणि त्यानंतर घूमजाव करण्याची वेळ आल्यामुळे पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आहे.