कराची, 6 फेब्रुवारी : गायीच्या शेणापासून (Cow dung) तयार झालेल्या उर्जेवर कराचीमध्ये (Karachi) बसेस चालवण्याचा प्रस्ताव पाक महिला मंत्री जरताज गुल (Zartaj Gul) यांनी संसदेत मांडला आहे. देशात आयात केल्या जाणाऱ्या डिझेल आणि पेट्रोलमध्ये 5 टक्के सल्फरचं प्रमाण असल्याचं, संसदेत याबाबत माहिती देताना गुल यांनी सांगितलं. जरताज गुल यांनी संसदेत याबाबत बोलताना सांगितलं की, बलुचिस्तान सीमेवर कारवाईनंतर 1100 पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहेत. सध्या देशभरात 1800 पेट्रोल पंप बेकायदेशीरपणे कार्यरत आहेत. तसंच, इस्लामाबादमधील लोखंडाच्या कारखान्यांवर, औद्योगिकीकरणामुळे होणाऱ्या प्रदूषणावरही नजर ठेवली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात गायीच्या शेणापासून तयार झालेल्या उर्जेवर बसेस चालवण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.
पाकिस्तानच्या महिला मंत्री जरताज गुल यांनी संसदेत हा प्रस्ताव मांडला आहे. दररोज हजारो टन शेण वाहून जातं. परंतु आता त्याचा उपयोग इंधन बनवण्यासाठी केला जाईल आणि या इंधनावर बसेस चालवल्या जातील. त्यामुळे कराचीमध्ये जवळपास 200 बसेस गायीच्या शेणापासून तयार झालेल्या इंधनावर चालू शकतील असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, गेल्या वर्षी 2020 मध्ये या प्रोजेक्टवर काम सुरू केलं जाणार होतं. रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये दररोज जवळपास 3200 टन शेण वाहून जातं. तसंच शेणाच्या साफ-सफाईसाठी 50 हजार गॅलनहून अधिक पाणी वाया जात असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे शेणाचा वापर करन इंधन निर्मिती केली जाणार आहे.