फोटो-रॉयटर्स
ढाका, 28 मे : एकीकडे जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना बांगलादेशमध्ये मात्र एक भयंकर प्रकार घडला. बुधवारी रात्री 10च्या सुमारास कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या रुग्णालयालाच आग लागली. यात 5 कोरोनाबाधितांच्या मृत्यू झाला. यात एक महिलेचाही समावेश होता. ही आग बांगलादेशमधील प्रसिद्ध गुलशन मार्केट परिसरात लागली. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी रात्री 10च्या सुमारास ही आग लागली. ही आग एवढी भीषण होती की रुग्णालयातील बेड्स जळून खाक झाले. आग लागल्यानंतर लगचेच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र तोपर्यंत 5 रुग्णांचा मृत्यू झासला होता. यात 4 पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार ही आग गुलशन परिसरातील कोरोना आयसोलेशन युनीट रुग्णालयाच्या तळ मजल्याला लागली. एसीचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाचा- 25 डॉक्टरांना ठेवण्यात आलेल्या मुंबईतील फॉर्च्युन हॉटेलमध्ये भीषण आग या आगीची भीषणता एवढी होती की, सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. त्यामुळं रुग्णांना बाहेर काढणं कठिण झाले होते. मात्र तरी तब्बल 2 तासांच्या प्रयत्नानंतर इतर रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. सध्या इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दरम्यान, या आगीच्या चौकशीचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्यानं रॉयटर्सला दिलेल्या माहितीत, ही आग रुग्णालयात सुरक्षेचा अभाव असल्यामुळं ही आग लगेच पसरली. अद्याप किती रुग्ण जखमी आहेत, यांची माहिती मिळालेली नाही आहे. वाचा- 6 फुटापर्यंतचे सोशल डिस्टन्सिंग पुरेसं नाही! अभ्यासातून आली महत्त्वपूर्ण माहिती दुसरीकडे बांगलादेशमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. आतापर्यंत 38 हजार 292 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 544 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळं बांगलादेशमध्येही सध्या 30 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. वाचा- धक्कादायक परिणाम! कोरोनाची पहिली लस दिलेला तरुण आधी झाला बेशुद्ध मग…