JOIN US
मराठी बातम्या / विदेश / ताजी बातमी: जपानचं Fighter Jet रडारवरून गायब, अनेक शक्यतांची चर्चा

ताजी बातमी: जपानचं Fighter Jet रडारवरून गायब, अनेक शक्यतांची चर्चा

जपानचं एक फायटर विमान गायब झालं आहे. उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच विमानाचा संपर्क तुटला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

टोकियो, 31 जानेवारी: जपानचं (Japan) फायटर जेट (Fighter Jet) रडारवरून अचानक गायब (Disappeared from Radar) झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान गायब झालं. त्याचा नियंत्रण कक्षाशी (Control Room) संपर्क (Contact) तुटल्यामुळे विमान नेमकं कुठल्या दिशेला गेलं, याचा शोध लागू शकलेला नाही. मात्र काही तास होऊनही विमानाशी संपर्क न झाल्यामुळे नेमकं काय घडलं असावं, याचे वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहेत.   अशी घडली घटना जपानच्या F15 Fighter Jet नं कोमात्सु विमानतळावरून टेकऑफ केलं. त्यानंतर पाचच मिनिटांमध्ये विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. विमानतळावरून टेकऑफ केल्यानंतर पाच किलोमीटर अंतर विमानाने पार करताच त्याचा नियंत्रण कक्षासोबत संपर्क तुटला आणि विमान गायब झालं. जपानच्या समुद्राच्या दिशेनं हे विमान उडालं होतं. विमानात किती प्रवासी? या विमानात दोन प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र नेमके किती प्रवासी विमानात होते, याची अधिकृत खातरजमा करण्यात आलेली नाही. कदाचित दोनपेक्षा अधिक प्रवासी या विमानात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कित्येक तास होऊनही या विमानाचा थांगपत्ता न लागल्यामुळे हे विमान समुद्रात क्रॅश झालं असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.   हे वाचा -

विमान गायब होण्याचा सिलसिला जपानची विमानं गायब होण्याची घटना यापूर्वीही घडली होती. 2019 सालीही F 35A या विमानाचा अपघात झाला होता. विमान नियोजित मार्ग सोडून इतरत्र भरटकलं होतं आणि त्यानंतर विमानाचा अपघात झाला होता. F15 फायटर जेटच्या बाबतीत नेमकं काय घडलं असावं, याचे विविध अंदाज वर्तवण्यात येत असले, तरी अद्याप शोध सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या