JOIN US
मराठी बातम्या / विदेश / नांदेडच्या शेतकरी कन्येची गगन भरारी; वयाच्या 14 व्या वर्षीच अमेरिकेत केलं यशस्वी विमानउड्डाण

नांदेडच्या शेतकरी कन्येची गगन भरारी; वयाच्या 14 व्या वर्षीच अमेरिकेत केलं यशस्वी विमानउड्डाण

Nanded news: नांदेडच्या शेतकरी कुटुंबातील एका 14 वर्षीय मुलीनं अमेरिकेत गगन भरारी घेतली आहे. तिनं अवघ्या चौदाव्या वर्षी यशस्वीपणे विमानउड्डाण करून दाखवलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नांदेड, 26 जून: नांदेडच्या शेतकरी कुटुंबातील एका 14 वर्षीय मुलीनं अमेरिकेत गगन भरारी घेतली आहे. तिनं अवघ्या चौदाव्या वर्षी यशस्वीपणे विमानउड्डाण करून दाखवलं आहे. एवढ्या कमी वयात अशी अनोखी कामगिरी केल्यानं नांदेडकरांची छाती अभिमानानं फुगली आहे.  रेवा दिलीप जोगदंड असं या शेतकरी कन्येचं नाव असून ती अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील रहिवासी आहे. 20 जून रोजी तिनं अवकाशात यशस्वी झेप घेतली आहे. तिच्या या कामगिरीची माहिती गावात कळताच सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला आहे. कोंढा येथील रहिवासी असणाऱ्या केशवराव बालाजी जोगदंड त्यांचा मुलगा दिलीप केशवराव जोगदंड 20 वर्षांपूर्वी अमेरिकेला स्थायिक झाले. याठिकाणी त्यांनी दोरीवर विमान उडवून दाखवण्याविषयी (स्ट्रिंग कंट्रोल्ड) यशस्वी संशोधन केलं आहे. आपल्या वडिलांमुळे रेवाला देखील अगदी लहान वयापासूनच पायलट होण्याची इच्छा मनात येत होती. तिनं बालपणापासून पायलट होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. यानंतर अवघ्या 14 व्या वर्षी तिनं आपलं पायलट होण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. रेवा जोगदंड हिने 20 जून रोजी यशस्वीपणे विमानउड्डाण केलं आहे. तिच्या या अभूतपूर्व यशाची माहिती कोंढा गावात कळताच जोगदंड परिवारासह कोंढा गावातील ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. आजोबा केशवराव जोगदंड यांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. रेवाच्या या कामगिरीचं अनेकांना अप्रुप वाटत होतं. हेही वाचा- Success Story: बाबा गेल्यानंतर शिक्षणासाठी दमडी नव्हती, सायकलचं पंक्चर काढणारा आज झाले IAS इतक्या लहान वयात रेवानं विमान उडवल्यानं आमची छाती अभिमानानं फुगली असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना कोंढा गावचे पोलीस पाटील म्हणाले की, ‘रेवानं इतक्या लहान वयात विमानउड्डाण केलं आहे. ती आमच्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. बाल वयात तिनं विमान उडवल्यानं तिची कामगिरी प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या