JOIN US
मराठी बातम्या / विदेश / मुलींसोबत video बनवणे पडले भारी, tiktok स्टारला खावी लागली जेलची हवा!

मुलींसोबत video बनवणे पडले भारी, tiktok स्टारला खावी लागली जेलची हवा!

2020 च्या जुलैमध्ये, कैरोच्या आर्थिक न्यायालयाने हनीन आणि आणखी एक टिकटॉक स्टार मवादा अल-अधम यांना दोषी ठरवलं. ‘कुटुंबातील मूल्ये आणि आदर्शांच्या विरोधात जात असल्याचा’ आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांना दोन वर्षांची शिक्षा आणि सुमारे 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 एप्रिल : एका महिला सोशल मीडिया स्टारला (Female social media star) तीन वर्षांच्या तुरुंगवासाची (jail) शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिला न्यायालयात मानवी तस्करी (Human trafficking) प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं. तिने तिच्या महिला फॉलोअर्सना टिकटॉकवर लाइव्ह व्हिडिओ (tiktok live video) एकत्र करण्यासाठी आमंत्रित केलं. त्या बदल्यात तिनं त्यांना पैसे देण्याची तयारीही दर्शवली होती. याच कारणामुळे 20 वर्षीय हनीन होसमवर व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मद्वारे पैशासाठी मुलींचं शोषण केल्याचा आरोप झाला होता. मात्र तिनं आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे प्रकरण इजिप्त येथील आहे. हनीनचे 9 लाखांहून अधिक फॉलोअर्स महिला सोशल मीडिया इन्फ्लुअर्सना (सोशल मीडियावर स्वतःचा प्रभाव टाकणाऱ्या आणि अ‌ॅक्टिव्ह असलेल्या महिला) दडपण्यासाठी हा खटला दाखल करण्यात आल्याचं मानवाधिकार कार्यकर्त्यांचं मत आहे. मानवाधिकारांशी संबंधित लोकांनी सांगितलं की, 2020 पासून आतापर्यंत हनीनसह 12 महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या लोकांचे लाखो फॉलोअर्स होते. अशा प्रकारे गुन्हे दाखल करणे गोपनीयतेचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समानता आणि शारीरिक स्वायत्ततेचं उल्लंघन करते. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, हनीन ही कैरो विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. ती लिप-सिंकिंगचे व्हिडिओ शेअर करायची आणि गाण्यांवर डान्स करायची. टिकटॉकवर तिला 9 लाखांहून अधिक लोकांनी फॉलो केलं होतं. तिला 2020 मध्ये पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिने आपल्या महिला फॉलोअर्सना Likee नावाच्या दुसर्‍या व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर सामील होण्यास सांगितले. जिथून ते थेट व्हिडिओ प्रसारित करून पैसे कमवू शकत होते. 2020 मध्ये पहिल्यांदा शिक्षा झाली 2020 च्या जुलैमध्ये, कैरोच्या आर्थिक न्यायालयाने हनीन आणि आणखी एक टिकटॉक स्टार मवादा अल-अधम यांना दोषी ठरवलं. ‘कुटुंबातील मूल्ये आणि आदर्शांच्या विरोधात जात असल्याचा’ आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांना दोन वर्षांची शिक्षा आणि सुमारे 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. (हे वाचा -  रशिया आणि युक्रेनमधील शांतता करार कठीण का आहे? कोणाला जास्त फटका बसणार? ) जानेवारी 2021 मध्ये त्यांनी पुन्हा न्यायालयात अपील केले. खटल्यादरम्यान त्या निर्दोष आढळून आल्या आणि त्यांची सुटका झाली. यानंतर त्यांच्यावर पुन्हा मानवी तस्करीचे आरोप झाले. जून 2021 मध्ये कैरो क्रिमिनल कोर्टाने या दोघींना पुन्हा दोषी ठरवलं. हनीनला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्याच वेळी, मवादा यांना 6 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. हनीनने अटकेपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये ती रडत होती. ‘मी काही चुकीचं केलं नाही. तरीही मला हे सर्व भोगावं लागलं,’ असं ती म्हणत होती. (हे वाचा -   बॉम्बस्फोटने काबूल हादरले; शाळा, ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठोपाठ स्फोट ) न्यायालयाच्या निर्णयावर मानवाधिकार कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले हनीनला पुन्हा सुनावणीची संधी देण्यात आली होती. पण त्याच न्यायालयाने हनीनला पुन्हा दोषी ठरवलं. तिला तीन वर्षांचा कारावास आणि सुमारे 8 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

संबंधित बातम्या

अमेरिकेतील मानवाधिकार वकील माया अल-सदानी यांनी या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी लिहिलंय, इजिप्तच्या न्याय व्यवस्थेने जगभरातील प्रभावशाली लोकांना गुन्हेगार ठरवलं आहे. ते इतरांना त्यांच्यासोबत रोज काम करण्यासाठी आमंत्रित करतात आणि टिकटॉक सारख्या क्रियाकलापांद्वारे पैसे कमवतात. त्यांना गुन्हेगार ठरवलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या