मॉस्को, 25 मार्च : रूस इथे बुधावरी सकाळी भूकंपानं हादरलं आहे. 7.5 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली आहे. कुरिल बेट या भूकंपान हादरलं आहे. हे बेट 1,400 किलोमीटर दूर साऊथ- साऊथईस्ट इथल्या सेवेरो या भागाला जोडलेलं आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) च्या अहवालानुसार स्थानिक वेळेनुसार बुधवारी दुपारी हे भूकंपाचे धक्के जाणवले. यूएसजीएसने भूकंपानंतर त्सुनामी येण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्या परिसरात प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी कऱण्यात आला आहे. सेवेरो-कुरिलस्क एक जवळजवळ 2500 लोकसंख्या असलेले एक छोटे शहर आहे. प्रथम भूकंपाची येथे 7.8 नोंदविली गेली, परंतु त्यानंतर 7.5 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता मोजल्यानंतर पुन्हा नोंदवण्यात आली आहे.
मॉस्को आणि टोकियो यांच्यासाठी कुरिल इथले चार दक्षिणेकडील बेटं वादाचा मुद्दा झाली आहेत.हबोमाई, शिकोटन, एटोरोफू आणि कुनाशिरी अशी या चार बेटांची नावं. कुरिल जपानच्या उत्तरेकडील क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. हे वाचा- …तर मेपर्यंत भारतात 13 लाख लोकांना होणार कोरोना, शास्त्रज्ञांनी दिला इशारा हे वाचा- कोरोनाच्या लढाईत माणुसकीची परीक्षा; 6 वर्षाच्या मुलाचा अंत्यविधी रोखला, अखेर… हे वाचा- होम क्वारंटाईनमध्ये टायगर नाही तर या खास व्यक्तीला वेळ देतेय दिशा पाटनी!