वॉशिंग्टन, 14 फेब्रुवारी: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कारकीर्द विशेष गाजली. दरम्यान ट्रम्प यांना (Donald Trump) एका प्रकरणामध्ये सिनेटकडून मोठा दिलासा मिळाला आहे. महाभियोगाच्या (Impeachment) प्रक्रियेतून वाचण्याची ट्रम्प यांची ही दुसरी वेळ आहे. त्यांच्यावर कॅपिटॉल हिल (US Capitol Attack) मध्ये हिंसा आणि दंगल भडवकण्याचा आरोप होता, या आरोपांतून त्यांची मुक्तता करण्यात आली आहे. 10 मतांमुळे ट्रम्प वाचले आहेत. या प्रक्रियेतील मतदानावेळी 57 सिनेटर्सनी त्यांना दोषी करार दिला होता, तर 43 सिनेटर्स यांना ट्रम्प निर्दोष आहेत असे वाटत होते. ट्रम्प यांना या प्रकरणी दोषी ठरवण्यासाठी सिनेटर्सचे तृतीयांश बहुमत अर्थात 67 मतांची आवश्यकता होती. ट्रम्प यांच्यावर आरोप होता की त्यांनी 6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकन संसद भवनामध्ये दंगे घडवून आणले होता. या दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता. बदनामी करण्याचे षडयंत्र- ट्रम्प रिपब्लिकन पार्टीच्या सात नेत्यांनी डेमोक्रेट्सची साथ दिली आणि ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केले. महाभियोगातून निर्दोष सुटण्याची ट्रम्प यांची ही दुसरी वेळ होती. शनिवारी झालेल्या सिनेट निर्णयाकडे ट्रम्प यांचा विजय म्हणून पाहिले जात आहे. (हे वाचा- VIDEO : नरेंद्र मोदींच्या दाढीला पाकिस्तान खरंच घाबरला का? नेमकं काय आहे प्रकरण? ) यानंतर ट्रम्प यांना हवे असल्यास 2024 मध्ये पुन्हा एकदा ते अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात. हिंसा भडकवण्याच्या आरोपावरून निर्दोष सुटल्यानंतर ट्रम्प यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. वकिलांनी फेटाळले सर्व आरोप या महाभियोग प्रकरणी 4 दिवस सुनावणी करण्यात आली आणि त्यानंतर पाचव्या दिवशी याबाबत मतदान घेण्यात आले. याआधी त्यांच्या वकिलांनी सुनावणी दरम्यान ट्रम्प यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. त्यांनी सिनेटमध्ये असे म्हटले होते रिपब्लिकन नेत्याविरूद्ध देशद्रोहाचा भडका उडविण्याचे आरोप हे ‘साफ खोटे’ आहेत आणि त्यांच्याविरूद्ध महाभियोगाची कारवाई ‘राजकीयदृष्ट्या प्रेरित’ आहे. (हे वाचा- कोरोना पॉझिटिव्ह महिलेनं सांगितलं विपरीत लक्षण; दुधाचा रंग हिरवा झाल्याचा दावा ) ‘ट्रम्प कायद्याचे समर्थक’ सिनेटच्या सुनावणीमध्ये पाचव्या दिवशी देखील ट्रम्प यांचे वकील ब्रूस कॅस्टर, डेव्हिड शोएन आणि मायकल वान डेर वीन यांनी माजी राष्ट्राध्यक्षांची बाजू मांडली. त्यांनी एक-एक करून ट्रम्प कसे निर्दोष आहेत, याबाबत त्यांनी युक्तिवाद केला. त्यांनी असे म्हटले की ट्रम्प हे कायदा व्यवस्थेचे समर्थक आहेत आणि त्यांनी कॅपिटॉल हिलमध्ये अराजकता भडकवली नाही. ट्रम्प यांच्या वकिलांना त्यांचे युक्तिवाद मांडण्यासाठी एकूण 16 तासांचा अवधी देण्यात आला.