जिनिव्हा, 11 एप्रिल : जगभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. एकूण मृतांची संख्या आता एक लाखांहून अधिक झाली आहे. अशा परिस्थितीत भारतासह जगातील सर्व देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. दरम्यान काही देशांमध्ये हे निर्बंध हटविण्याबाबत विचार केला जात आहे. भारतातही 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्याआधीच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंध हटविण्याबाबत सावध राहण्याचा इशारा दिला आहे. WHOचे महासंचालक टेड्रॉस अॅडॅनॉम घेब्रेयसिस यांनी लॉकडाऊन हटविण्याबाबत विचार करण्याआधी होणाऱ्या परिणामांचा विचार करा. लॉकडाऊन हटवल्यास कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा दिला. आफ्रिकेतील काही देश लॉकडाऊन हटविण्याबाबत विचार करत आहेत. या देशांना सावध करण्यासाठी टेड्रॉस यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पुण्यातील गणेश पेठेतून 17 जणं ताब्यात, लॉकडाऊन असतानाही नमाजसाठी आले होते एकत्र टेड्रॉस यांच्या मते, इटली, जर्मनी, स्पेन आणि फ्रान्स अशा काही युरोपीय देशांमध्ये साथीच्या आजाराचे प्रमाण कमी होत आहे. याचे एक कारण लॉकडाऊन आहे. सद्यरिस्थितीत कोणत्याही देशाकडे ठोस उपाय नाही आहेत, त्यामुळे लॉकडाऊन हटवणे ही धोक्याची बाब असेल, असेही टेड्रॉस यांनी सांगितले. भारतात कोरोना झपाट्याने वाढत आहे. ओडिशा आणि पंजाब या राज्यांनी याधीच लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. दोन्ही राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊनची मर्यादा वाढविली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊन वाढवण्याचं आवाहन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त देशांतर्गत प्रवासावर प्रतिबंध असू शकतो. लॉकडाऊनची मर्यादा वाढवणारं ओडिशा हे पहिलं राज्य ठरलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रेशखर राव यांच्यासह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही लॉकडाऊन वाढविण्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. देशातील अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची कोरोनाच्या संकटापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचं आवाहन केलं आहे. नाशिकमध्ये पोलिस प्रशासन हादरलं, वरिष्ठ अधिकाऱ्यालाच कोरोनाची लागण