JOIN US
मराठी बातम्या / विदेश / कोरोनाची लस घ्या आणि लाखो रुपये घेऊन जा; व्हायरसविरोधी लसीच्या ह्युमन टेस्टसाठी शास्त्रज्ञांनी दिली ऑफर

कोरोनाची लस घ्या आणि लाखो रुपये घेऊन जा; व्हायरसविरोधी लसीच्या ह्युमन टेस्टसाठी शास्त्रज्ञांनी दिली ऑफर

लंडनमधील (London) एका कंपनीने कोरोनाव्हायरसची लस (Coronavirus vaccine) तयार केली आहे आणि त्याची चाचणी (Test) करण्यासाठी 24 लोकांना बोलवलं आहे.

जाहिरात

पुण्यात पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ही 57523 एवढी झाली आहे. तर 18040 जण सक्रिय रुग्ण आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 11  मार्च : चीनहून (China) जगभरात पसरलेल्या कोरोनाव्हायरसवरील (Coronavieus) उपचार जगभरातील शास्त्रज्ञ शोधत आहेत. लंडनच्या (London) शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसची लस तयार केल्याचा दावा केला आहे. या लसीची स्वत:वर चाचणी करून घेणाऱ्याला लाखो रुपये दिले जाणार आहेत. डेली मेलने (Daily mail) दिलेल्या वृत्तानुसार, व्हाइटचॅपेलमधील (Whitechapel) क्विन मेरी बायोएंटरप्रायझेस इनोव्हेशन सेंटरने (Queen Mary BioEnterprises Innovation Centre) कोरोनाव्हायरसविरोधातील लसीच्या चाचणीसाठी 24 लोकांना बोलवलं आहे. जो कोणी या लसीची चाचणी स्वत:वर करून घेईल, त्याला 3,500 पाऊंड म्हणजे तब्बल 3 लाख रुपये दिले जाणार आहेत. मात्र त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे, यासाठी त्या व्यक्तीला कोरोनाव्हायरसने संसर्ग करून घ्यावा लागेल. हे वाचा -  Coronavirus आधी ‘या’ महाभयंकर आजारांमुळेही जगभरात लागू झाली होती हेल्थ एमर्जन्सी ज्या व्यक्ती या चाचणीत सहभागी होतील त्यांच्या शरीरात कोरोनाव्हायरसचा कमजोर असा स्ट्रेन (strain) टाकला जाईल. ज्यामुळे त्या व्यक्तीमध्ये कोरोनाव्हायरस संक्रमणाची शक्यता वाढते. जेव्हा कोरोनाव्हायरसचा प्रभाव या व्यक्तीवर दिसून येईल, तेव्हा त्याच्यावर एचव्हीव्हो (Hvivo) कंपनीने तयार केलेल्या लसीची चाचणी केली जाईल. एचवीवो कंपनीने सांगितलं की, ‘24 लोकांवर कोरोनाव्हायरस लसीची चाचणी केली जाईल, ज्यांना 14 दिवसांसाठी वेगळं ठेवलं जाईल. 2 आठवडे या कोरोना संक्रमित व्यक्तींवर काही परिणाम होतो का याचा अभ्यास केला जाईल’ जगभरात कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढतो आहे. युरोपियन देशांमध्ये 35 कंपन्यांनी औषधं बनवत आहे. यूके सरकारने कोरोनाव्हायरसच्या लसीसाठी निधीही दिला आहे. जगभरात कोरोनाव्हायरसचे 1,18,180 रुग्ण आहेत. तर 4,292 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. फक्त चीनमध्ये 3,158 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 80 हजारपेक्षा लोकं व्हायरसने पीडित आहेत. हे वाचा -  जगातील सर्वात हेल्दी देशही ‘कोरोना’च्या विळख्यात, व्हायरसमुळे झाले बेजार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या