वुहान, 21 मार्च : आतापर्यंत जगभरात दोन लाखांहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर, 11 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. खोकला, सर्दी आणि उच्च ताप यांची लक्षणे दिसलेल्या प्रत्येक व्यक्तिला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. अशी परिस्थिती असली तरी, अजूनही कोरोनाचा मृत्यू दर कमी आहे. मात्र कोरोनाला हरवलेले रुग्णांची कथा मात्र भयावह आहे. कोरोनाला हरवलेल्या एका 25 वर्षीय कॅनोर रीड या रुग्णाने आपले अनुभव सांगितले. या तरुणाच्या डायरीमधील अनुभव अंगावर काटा आणणारे आहे. या तरुणाने आपल्या अनुभवात असे म्हटले आहे की ते, हा विषाणू एवढा धोकादायक आहे की, काही दिवसांनी मृत्यूच डोळ्यासमोर दिसतो. वाचा- 63 कोरोनाबाधितांपैकी 12 ते 14 जणांना संसर्गातून लागण - राजेश टोपे 25 वर्षाचा कॅनोर रीड चीनच्या वुहान येथील शाळेत नोकरीस आहे. कोरोना विषाणूची शिकार झालेल्या कॅनोरने डायरीत कोरोना विषाणूबाबत लिहिले होते. कॅनोरने आपले राजचे अनुभव या डायरीमध्ये लिहिले होते. त्याच्या वेदनाची कहाणी वाचून अंगावर शहारे येतील. वाचा- जमिनीपासून आकाशापर्यंत सगळं बंद! जाणून घ्या ‘जनता कर्फ्यु’बाबत सर्व माहिती कॅनोरने कोरोनाला मृत्यूचे नाव दिले आहे. कोरोनामुळे फक्त त्रास होत नाही तर, मृत्यूच डोळ्यासमोर दिसतो. डोक्यात सतत एक कळ जात असते. असे वाटत राहते की सतत कोणीतरी डोक्यावर हातोडा मारत आहे. कान सुन्न होतात, असे सांगत कोनॉरने लोकांना या विचित्र छळातून मुक्त होण्यासाठी इअरबड्स वापरू नका असा सल्लाही दिला आहे. दरम्यान कॅनोरने तब्बल 4 आठवडे कोरोनाला लढा दिल्यानंतर, बरा झाला. वाचा- चीननंतर इटली आणि इराण असा सापडला कोरोनाव्हायरसच्या विळख्यात कोरोनाचा मृत्यू दर कमी असला तरी, त्यांचा संसर्ग जलद होत आहे. आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. तर 11 हजार लोकांचा यात मृत्यू झाला आहे. चीनच्या वुहानमधून आलेला हा व्हायरस आता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरत आहे. त्यामुळं कोरोनापासून वाचण्यासाठी सध्या लोकांना स्वत:ची काळजी घ्यावी लागणार आहे.