JOIN US
मराठी बातम्या / विदेश / धक्कादायक! चीनच्या पावलावर पाऊल टाकतोय 'हा' देश, 6 हजार मृतांची माहिती लपवली

धक्कादायक! चीनच्या पावलावर पाऊल टाकतोय 'हा' देश, 6 हजार मृतांची माहिती लपवली

अल जजीराने दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटनमधील कोरोनामध्ये मृत्यूचे प्रमाण बरेच जास्त आहे. मात्र सरकार अद्याप ते स्वीकारण्यास तयार नाही आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 15 एप्रिल : ब्रिटन हा जगातील सहावा असा देश आहे, जेथे कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सध्या 93 हजार 873 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आतापर्यंत 12 हजार 107 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र आता असा आरोप केला जात आहे की ब्रिटनने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती खोटी दिली आहे. ही आकडेवारी खोटी असून, यापेक्षा जास्त लोकांचा ब्रिटनमध्ये मृत्यू झाल्याची शक्यता आहे. आरोपांनुसार, केवळ राष्ट्रीय आरोग्य सेवामधी (NHS) मृत्यूच्या आकडेवारीत समाविष्ट केली गेली आहे, तर नर्सिंग होममधील मृत्यूंचा समावेश नाही. अल जजीराने दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटनमधील कोरोनामध्ये मृत्यूचे प्रमाण बरेच जास्त आहे. मात्र सरकार अद्याप ते स्वीकारण्यास तयार नाही आहे. ब्रिटनमध्ये कोरोना संसर्गामुळे गेल्या 24 तासात 778 लोक मरण पावले आहेत. ब्रिटनच्या द ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सच्या(ONS) मते, कोरोनामधील मृत्यू झालेल्यांमध्ये नर्सिंग होमचा समावेश करण्यात आलेला नाही. ONSने असा दावा केला आहे की 3 एप्रिलपर्यंत यूके नर्सिंग होममध्ये श्वसनाच्या आजारामुळे 5 हजार 979 लोकांचा मृत्यू झाला आहे, यापैकी किती कोरोनास ग्रस्त आहेत याचा काहीच पत्ता नाही. याआधी चीननेही असाच प्रकार केला होता. वाचा- दहशतवाद्यांनाही कोरोना, पाकने उपचारास नकार दिल्याने अतिरेकी भारतात करणार प्रवेश? ‘फक्त NHS डेटा समाविष्ट केला जात आहे’ हार्वर्ड्स स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या एपिडोमोलॉजीचे प्राध्यापक बिल हेन्झ यांच्या म्हणण्यानुसार, यूकेमध्ये मृत्यूची संख्या जास्त असू शकते हे आश्चर्यकारक नाही, आतापर्यंत NHSच्या आधारे मृतांचा आकडा नोंदवला गेला आहे. देशातील प्रत्येक रुग्णालयात लोक कोरोनामुळे मरत आहेत आणि दररोज रात्री मोजणी करून हा आकडा जाहीर केला जात आहे. ही आकडेवारी योग्य नाही कारण ती हजारो नर्सिंग होममधील मृत्यू विचारात घेत नाही. वाचा- सावधान! 3 मेपर्यंत ‘या’ 13 सेवा राहणार बंद, वाचा संपूर्ण यादी का लपवतंय ब्रिटन माहिती? लंडनमधील अल जझीराच्या रिपोर्टर चार्ली अँजेलाच्या म्हणण्यानुसार ब्रिटनमधील सरकार अजूनही असा विश्वास ठेवत आहे की कोरोनाच्या उच्चांकापासून देश दहा दिवस दूर आहे आणि मृत्यूची संख्या वाढू शकते. नर्सिंग होम्समध्येच मृत्यूंचा समावेश करण्याच्या प्रश्नावर इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य संचालकांनी असे म्हटले आहे की, लवकरच सर्व माहिती एककत्र केली जाईल. वाचा- लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात ‘या’ सेवांना मिळाल्या सवलती, मात्र नियम असणार कडक

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या