JOIN US
मराठी बातम्या / विदेश / पाकिस्तानची वाईट अवस्था! पंतप्रधानांनी लोकांकडून मागितला 1 रुपया

पाकिस्तानची वाईट अवस्था! पंतप्रधानांनी लोकांकडून मागितला 1 रुपया

पाकिस्तानमध्ये लोकांवर उपासमारीची वेळ आहे. या सगळ्या परिस्थितीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लोकांकडून मदत मागितली आहे.

जाहिरात

रिपोर्टनुसार एवढा कार्बनचा धूर तयार होईल की 20-25 टक्के सूर्यकिरण जमिनीवर कमी पडतील. जमिनीतील सत्त्व कमी होतील आणि 15 ते 30 टक्के पिक कमी होईल. या हल्ल्यानंतर जमिनीला सावरायला किमान 10 वर्ष लागतील.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इस्लामाबाद, 01 मे : कोरोनामुळं साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनामुळं परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशातच पाकिस्तानमध्ये लोकांवर उपासमारीची वेळ आहे. या सगळ्या परिस्थितीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लोकांकडून मदत मागितली आहे. इम्रान खान यांनी लोकांना खुल्या मनानं दान करण्यास सांगितले आहे. यासाठी त्यांनी, तुम्हा आता एक रुपया द्याल, सराकर उद्या तुम्हाला 4 रुपये देईल, असे आश्नासन दिले. इम्रान यांनी आपल्या काही मंत्र्यांसमवेत माध्यमांना भेट दिली आणि सरकारच्या एका रुपयांच्या बदल्यात चार रुपये देण्याच्या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले की कोरोना व्हायरस रिलीफ फंडाच्या पैशाचा उपयोग अशा लोकांच्या मदतीसाठी केला जाईल ज्यांना रोजगार नाही आहे. यासाठी लवकरच एसएमएस सेवा सुरू केली जाईल आणि लोकांना बेरोजगारीचा पुरावा सरकारला द्यावा लागेल. वाचा- पाकमध्ये आणखी एका हायप्रोफाईल नेत्याला कोरोना, इम्रान खान यांची घेतली होती भेट इम्रान यावेळी असेही म्हणाले की, देशातील कोरोनामधील मृत्यूचे प्रमाण वाढेल ही भीती होती, मात्र प्रमाण त्यापेक्षा कमी आहे. ते म्हणाले, “आम्हाला वाटले की आतापर्यंत देशातील आयसीयू कोरोना रूग्णांनी भरुन जाईल आणि त्यांना जागा मिळणार नाही परंतु तसे झाले नाही. कोरोना प्रकरणे आणि मृत्यूची संख्या अपेक्षेपेक्षा कमी राहिली आहे.”. तसेचही ते असेही म्हणाले की, विदेशात अडकलेल्या परदेशीय पाकिस्तानी लोकांना घरी आणण्यासाठी त्यांचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. वाचा- दफन करण्यासाठी नव्हती जागा, ख्रिश्चन व्यक्तीवर हिंदू पद्धतीनं अंत्यसंस्कार पाकमधील हायप्रोफाईल नेत्यांना कोरोना कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच जात आहे. सामान्य लोकांपासून, अभिनेते आणि नेते सगळेच याला बळी पडले आहेत. आता पाकिस्तानच्या संसदेच्या अध्यक्षांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. अध्यक्ष असद कैसर यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील राज्यपालांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले होते. वाचा- कोरोनावर मोठ्या हिम्मतीनं केली मात, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या