JOIN US
मराठी बातम्या / विदेश / 173 वर्षांपूर्वी मिळालेल्या मदतीची जाणीव ठेवत कोरोनाच्या संकटात दिला हात!

173 वर्षांपूर्वी मिळालेल्या मदतीची जाणीव ठेवत कोरोनाच्या संकटात दिला हात!

मूळ अमेरिकेनं 173 वर्षांपूर्वी केलेल्या मदतीची परतफेड करताना तेव्हाच्या रकमेचे आताच्या हिशोबाने होतील एवढे पैसे दिले आहेत.

जाहिरात

मात्र असा अंदाज व्यक्त करणं योग्य नसल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. असा अंदाज बांधता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 06 मे : जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. आतापर्यंत अमेरिकेत 12 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांची संख्या 70 हजारांहून जास्त आहे. कोरोनाच्या या संकटात अमेरिकेला बाहेरील देशांकडूनही मदत केली जात आहे. यात एक अशी मदत आहे जी 173 वर्षांपूर्वी केलेल्या मदतीची परतफेड कऱण्यासाठी केली जात आहे. 1847 मध्ये आय़र्लंडमध्ये ग्रेट पोटॅटो हा साथीचा आजार पसरला होता. त्यावेळी नेटिव्ह अमेरिकेच्या Choctaw Nation ने आयर्लंडमधील लोकांना मदत केली होती. साथीच्या आजारावर मात करण्यासाठी त्यावेळी 170 डॉलर्स देण्यात आले होते. याच मदतीची आठवण ठेवून आज अमेरिकेला कोरोनाच्या संकटात त्यांनी मदतीचा हात दिला आहे. आयर्लंडमधील ज्या लोकांना 173 वर्षांपूर्वी मदत मिळाली होती त्यांना आता अमेरिकेला पैसे दिले आहेत. तेव्हाची रक्कम आताच्या तुलनेत या लोकांनी दिली आहे. 170 डॉलर्सच्या मदतीचे त्यांनी 5000 हजार डॉलर्स दिले आहे. भारतीय रुपयांमध्ये सांगायचे झाले तर 3.7 लाख रुपये इतके होतात. हे वाचा : ‘X Æ A-12’ असं नाव कोण ठेवतं? नेटकरी शोधत आहेत एलन मस्कच्या मुलाच्या नावाचा अर्थ अमेरिकेतील नवाजो प्रांतात मदतीसाठी क्राउंडफंडिंगचा आधार घेतला आहे. आतापर्यंत यामध्ये 23 लाख डॉलरची रक्कम जमा झाली आहे. यात आयर्लंडचा सर्वाधिक वाटा आहे. आय़र्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनीही म्हटलं आहे की, तुमच्या लोकांनी केलेली मदत आम्ही कधीही विसरणार नाही. हे वाचा : दुधाची तहान ताकावर…कोरोना लॉकडाऊनमुळे दारू मिळेना, मग लोकांनी काय केलं पाहा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या