JOIN US
मराठी बातम्या / विदेश / ‘डान्स अगेन्स्ट द व्हायरस’, 'कोरोना'पासून वाचण्यासाठी पाहा हा Video

‘डान्स अगेन्स्ट द व्हायरस’, 'कोरोना'पासून वाचण्यासाठी पाहा हा Video

कोरोनाव्हायरसपासून (Coronavirus) स्वत:चा बचाव कसा करावा याबाबत सोशल मीडियाच्या (Socia medica) माध्यमातून मार्गदर्शन केलं जातं आहे. ‘कोरोना डान्स’चे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 07 मार्च :  जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसवर (Coronavirus) उपचार शोधत आहेत. नागरिकांनाही खबरदारी घेण्याचं आवाहन सरकारनं केलं जातं आहे. कोरोनाव्हायरसपासून स्वत:चा बचाव कसा करावा याचा सल्ला दिला जातो आहे. पोस्टर्स, बॅनर्स, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना कोरोनाव्हायरसबाबत जागरूक केलं जातं आहे. सोशल मीडियावरील अशाच काही व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे, तो म्हणजे ‘हँडवॉशिंग डान्स’ आणि ‘डान्स अगेन्स्ट द व्हायरस’. संबंधित -  सर्दी, खोकला, ताप; मला कोरोनाव्हायरस तर नाही ना? शंका असल्यास ‘या’ चाचण्या करा काही दिवसांपूर्वी टिकटॉकवर 2 तरुणांनी कोरोनाव्हायरसपासून वाचण्यासाठी ‘हँडवॉशिंग डान्स’ करून दाखवला. महाभयंकर विषाणूपासून वाचण्यासाठी हात स्वच्छ धुणे हा एक मार्ग आहे. त्यामुळे लोकांनी नेमकं हात कसे धुवावेत हे या टिकटॉक व्हिडीओतून तरुणांनी दाखवलं. युनिसेफनंही हा टिकटॉक व्हिडीओ ट्विट केला होता.

याशिवाय बँकॉकमध्येही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. AFP न्यूज एजन्सीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रेल्वे कर्मचारी स्वच्छता करत आहेत आणि कोरोनाव्हायरसपासून स्वत:चा बचाव कसा कराल, याची माहिती देत आहेत.

भारतात कोरोनाव्हायरसचे एकूण 33 रुग्ण सापडलेत. जगभरातील कोरोनाव्हायरस रुग्णांची एकूण संख्या 98 हजारपेक्षा जास्त झाली आहे, तर 3 हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चीननंतर कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या देशांमध्ये दक्षिण कोरिया, इटली, इराण आणि फ्रान्सचा समावेश आहे. संबंधित -  चीननंतर ‘या’ देशात Coronavirus चा कहर, 24 तासांत तब्बल 49 रुग्णांचा मृत्यू

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या