JOIN US
मराठी बातम्या / विदेश / 'कोरोना'च्या दहशतीत चिमुरडीचा निरागसपणा, मास्क घालून बिस्कीट खाताना तिचा हा Video पाहा

'कोरोना'च्या दहशतीत चिमुरडीचा निरागसपणा, मास्क घालून बिस्कीट खाताना तिचा हा Video पाहा

महाभयंकर अशा कोरोनाव्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगात दहशत पसरवली आहे. सर्वत्र भीतीचं वातावरण आहे, मात्र अशाच भयभीत झालेल्या या चेहऱ्यावर हसू आणलं ते एका चिमुरडीनं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीजिंग, 02 मार्च :  कोरोनाव्हायरसबाबत (Coronavirus) विविध बातम्या आपल्या कानावर येत आहेत, अनेक व्हिडीओ (Video) आपण पाहिलेत. या महाभयंकर अशा विषाणूने संपूर्ण जगात दहशत पसरवली आहे. सर्वत्र भीतीचं वातावरण आहे, मात्र अशाच भयभीत झालेल्या या चेहऱ्यावर हसू आणलं ते एका चिमुरडीनं. चीनमधील पीपल्स डेली या वृत्तसंस्थेनं ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतील चिमुरडीच्या निरागसपणानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

संबंधित बातम्या

कोरोनाव्हायरसची लागण होऊ नये, म्हणून या चिमुरडीला मास्क घालण्यात आला आहे. मात्र तिच्या हातात बिस्कीट आहे, जे तिला खायचं आहे आणि मास्क न काढताच या चिमुरडीनं ते बिस्कीट खाल्लं. यातही मजेशीर गोष्ट म्हणजे त्यानंतर तिनं दिलेली प्रतिक्रिया मास्क घालून बिस्कीट खाल्ल्याने तिला या बिस्कीटची चवच लागली नाही. त्यामुळे आपण बिस्कीट तर खाल्लं मात्र त्याची चव कशी लागली नाही, असा प्रश्न तिला पडला आणि ती बिस्कीटकडे पाहतच राहिली. संबंधित -  Coronavirus चा चीनला असा झाला फायदा, फोटो पाहाल तर विश्वासही नाही बसणार खरंतर तिचा हा व्हिडीओ पाहून थोडंसं हसूही येतंय आणि तिची दयाही येते कारण मास्क घातल्याने तिला ते बिस्कीट खाता येत नाहीये. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर भरपूर प्रतिक्रिया आल्या. सर्वांनी या मुलीच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. तिला कोरोनाव्हायरस होऊ नये,  तिचा हा निरागसपणा असाच कायम राहावा, अशा प्रतिक्रिया युझर्सनी दिल्यात. संबंधित -   बापरे ! कुत्र्यालाही झाला ‘कोरोना’, माणसांमार्फत प्राण्यांमध्ये पसरतोय व्हायरस

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या