JOIN US
मराठी बातम्या / विदेश / कमालच झाली! कोरोनाग्रस्त हेअरस्टायलिस्टच्या संपर्कात आलेल्या एकालाही झाला नाही कोरोना

कमालच झाली! कोरोनाग्रस्त हेअरस्टायलिस्टच्या संपर्कात आलेल्या एकालाही झाला नाही कोरोना

140 ग्राहक या कोरोनाग्रस्त हेअरस्टायलिस्टच्या (corona positive hairstylist) संपर्कात आले होते.

जाहिरात

प्रातिनिधीक फोटो (न्यूज 18)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 13 जून : कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यानंतर अनेकांना कोरोनाव्हायरसची लागण झालेली आहे. मात्र अमेरिकेच्या मिसौरीमध्ये (Missouri) दोन कोरोनाग्रस्त हेअरस्टाइलिस्टच्या (coronavirus infected hairstylist) संपर्कात आलेल्या एकालाही कोरोनाव्हायरसची लागण झालेली नाही. स्प्रिंगफिल्डमधील हे प्रकरण आहे. हे दोघंही हेअरस्टायलिस्ट एकाच सलूनमध्ये काम करत होते. गेल्या महिन्यात या दोन्ही हेअरस्टायलिस्टना कोरोना असल्याचं निदान झालं. कोरोनाव्हायरसची लागण झालेली असतानाही या दोघांनी जवळपास 140 ग्राहकांना सेवा दिली. शिवाय महिनाभर त्यांच्यासह सात कर्मचारीही काम करत होते. यानंतर या हेअरस्टायलिस्टच्या संपर्कात आलेल्या 46 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यात ते नेगेटिव्ह आढळले. तर इतरांना 14 दिवस होम क्वारंटाइन करण्यात आलं होतं, त्यांनाही कोरोनाव्हायरसची लागण झालेली नसल्याचं निदान झालं.

संबंधित बातम्या

भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर अतुल गावंडे यांनीदेखील हे ट्विट केलं आहे. सीएनएन रिपोर्टनुसार, या सलूनमध्ये आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली होती. ग्राहकांना वेळ ठरवून दिलेली होती, शिवाय हेअरस्टालिस्ट आणि ग्राहक यांच्यामध्ये पुरेसं अंतरही ठेवलं जात होतं. एकंदरच काय तर सोशल डिस्टन्सिंगचं पालन या सलूनमध्ये करण्यात आलं. शिवाय स्टाफ आणि ग्राहकांना मास्क घालणं बंधनकारक होतं. हे वाचा -  आई थोर तुझे उपकार! मुलांसाठी काढून दिला आपल्या काळजाचा तुकडा कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग किती महत्त्वांचं आहे हे या प्रकरणातून पुन्हा सिद्ध झालं आहे. अनेक अभ्यासांमध्येही कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी या दोन गोष्टी महत्त्वपूर्ण असल्याचं सांगण्यात आलं आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा -  पाकिस्तानात लॉकडाऊन ऐवजी ‘स्मार्ट लॉकडाऊन’ - काय आहे हा प्रकार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या