JOIN US
मराठी बातम्या / विदेश / गाईंपासून तयार करणार कोरोनावर औषध, अमेरिकेतल्या कंपनीने केला दावा

गाईंपासून तयार करणार कोरोनावर औषध, अमेरिकेतल्या कंपनीने केला दावा

SAB Biotherapeutics ही कंपनी गेल्या 20 वर्षांपासून गाईंवर संशोधन करत आहे. अनेक रोगांवर मात करण्याची क्षमता गाईंमध्ये क्षमता आहे असा त्यांचा दावा आहे.

जाहिरात

Cows eat feed mixed with excess milk on the Thiele Dairy Farm, Tuesday, May 5, 2020, in Cabot, Pa. Due to changes in the market from the new coronavirus pandemic, farmers find themselves with a glut of perishable products that they cannot sell and aren't able to donate. Farmer William Thiele has had to dump milk or feed it back to his cows in this way since his cows are making more milk than he can sell. (Alexandra Wimley/Pittsburgh Post-Gazette via AP)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन 9 जून: कोरोनावर औषध शोधण्याचं काम सर्व जगभर सुरू आहे. अनेक कंपन्यांनी औषध शोधण्यात प्रगती केल्याचा दावाही केला आहे. या शोधात अमेरिका सर्वात पुढे आहे. कोरोनावर मात करण्यासाठी गाईपासून Antibodies तयार करण्यात आल्याचा दावा SAB Biotherapeutics या अमेरिकेच्या कंपनीने केला आहे. त्याच्या क्लिनिकल चाचण्याही लवकरच सुरू करू असाही त्यांचा दावा आहे. याबाबतचं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे.जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचे तज्ज्ञ अमेश अदाल्जा यांनी अशा प्रकारच्या संशोधनाचं स्वागत केलंय. कंपनीचा दावा हा सकारात्मक असून कोरोविरुद्ध सगळ्याचं प्रकारचं संशोधन झालं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं.SAB Biotherapeutics ही कंपनी गेल्या 20 वर्षांपासून गाईंवर संशोधन करत आहे. अनेक रोगांवर मात करण्याची क्षमता गाईंमध्ये क्षमता आहे. ती शरिरात अतिशय लवकर Antibodies तयार करू शकते असं आढळून आल्याचा दावा कंपनीचे सीईओ एडी सुलिवन यांनी सांगितलं. इतर प्राण्यांच्या तुलनेत गाईंमध्ये जास्त प्रमाणात रक्त असतं. त्यामुळे त्यात जास्त प्रमाणात Antibodies असतात. त्याचा माणसांसाठी चांगला वापर करता येऊ शकतो असं मतही त्यांनी व्यक्त केलं.त्याचे प्रयोग सुरू असून कंपनी लवकरच क्लिनिकल ट्रायलही सुरू करणार आहे. गाईमध्ये सात दिवसांच्या आत कोरोना व्हायरसविरुद्धच्या Antibodies तयार होत असल्याचं आढळल्याचा दावाही कंपनीने केला आहे. हेही वाचा -  ‘वडिलांनी वर्षभराच्या पगारातू मला अमेरिकेचं तिकीट काढून दिलं ' किम जोंग उनला वाटते कोरोनाची भीती, हुकूमशहाच्या बैठकीची Inside Story बाहेर! संपादन - अजय कौटिकवार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या