JOIN US
मराठी बातम्या / विदेश / चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा धोका! परदेशी नागरिकांमुळे प्रादुर्भाव वाढल्यानं हार्बिन शहर लॉकडाऊन

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा धोका! परदेशी नागरिकांमुळे प्रादुर्भाव वाढल्यानं हार्बिन शहर लॉकडाऊन

जगभर कोरोना पसरायला ज्या वुहान शहरातून सुरुवात झाली तिथं कोरोनाचे फक्त दोनच रुग्ण आहेत. मात्र दुसऱ्या एका शहरात 4 हजार जणांची कोरोना टेस्ट कऱण्यात आली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीजिंग, 23 एप्रिल : चीनमध्ये कोरोना व्हायरसचा धोका पुन्हा एकदा वाढला आहे. देशात बाहेरून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. चीनमधील उत्तर पूर्व हेअलोंगजियांग प्रांतातील हार्बिन इथं कोरोना व्हायरसचं संक्रमण वेगाने होत आहे. एक कोटी लोकसंख्या असलेल्या हार्बिनमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. हार्बिन शहर हे हेइलोंगजियांगची राजधानी आहे. एक विद्यार्थी नुकताच न्यूयॉर्कमधून परतला होता. त्याच्यापासून जवळपास 70 लोकांना कोरोना झाला आहे. याशिवाय 4 हजार जणांची टेस्टही करण्यात आली आहे. कोरोनाच्या रुग्णांची इतकी मोठी संख्या समोर आल्यानंतर सरकारने पूर्ण शहर सील केलं आहे. हार्बिन हे शहर रशियाच्या सीमेला लागून आहे. अधिकाऱ्यांनी संपूर्ण शहरात सर्वप्रकारच्या हालचालींवर बंदी घातली आहे. चीनच्या हेइलोंगजियांग इथं कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सर्वाधिक चीनमध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. याआधी सुइफेन्हे शहरात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली होती. जगभर कोरोना पसरायला ज्या वुहान शहरातून सुरुवात झाली तिथं कोरोनाचे फक्त दोनच रुग्ण आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन करणं चीनसाठी मोठी चिंतेची बाब आहे. वुहानमधील लॉकडाऊन 8 एप्रिलला हटवण्यात आलं आहे. हे वाचा : कोरोना योद्ध्यांवरील संकट कायम, 24 तासांपूर्वी पॉझिटिव्ह आलेली नर्स उपचाराविना चीनमध्ये नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत ते एसिम्टोमॅटिक आहेत. ज्यांच्यामध्ये प्रादुर्भावाची लक्षणं दिसत नाहीत. हार्बिनमध्ये आढळलेले सर्व रुग्ण एसिम्टोमॅटिक होते. या सर्वांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यांच्या दोन न्यूक्लिक टेस्ट आणि एक अँटिबॉडी टेस्ट पास झाल्यानंतरच क्वारंटाइनमधून सुटका होईळ. या ठिकाणी क्वारंटाइनचा कालावधी 28 दिवसांचा करण्यात आला आहे. हे वाचा : भारतानं करून दाखवलं! मोदींचा प्लॅन यशस्वी; ही घ्या अमेरिकेच्या तुलनेतली आकडेवारी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या