मुंबई, 6 डिसेंबर : गेल्या दोन वर्षांपासून सुरू असेलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे जगातील अनेक लहान-मोठे उद्योगधंदे आर्थिक संकटात सापडलेले आहेत. काहींना या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यात यश मिळालं आहे तर काही कंपन्यांना डबघाईला आल्या आहेत. आर्थिक ताण कमी करण्यासाठी अनेक कंपन्यांनी कामगार कपात (Layoff) केली आहे. त्यामुळं एकाचवेळी शेकडो लोक बरोजगार होण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. ऑनलाईन हाउसिंग फायनान्स (Housing Finance) सुविधा देणाऱ्या एका अमेरिकन कंपनीतील कर्मचाऱ्यांना नुकताच या गोष्टीचा प्रत्यय आला. या कंपनीनं फक्त एका झूम कॉलवर (Zoom Call) एकाचवेळी 900 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याची सूचना दिली. बेटर डॉट कॉम (Better.com) असं या कंपनीचं नाव आहे. आजतकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. डिसेंबर महिना हा अमेरिकेमध्ये वार्षिक सुट्टीचा काळ असतो. महिन्याच्या सुरुवातीला जवळपास सर्व अमेरिकन नोकदार आपलं कुटुंब आणि मित्रांसह दीर्घकालीन सुट्ट्यांच प्लॅनिंग करण्यात व्यस्त असतात. नेमक्या याच वेळी बेटर डॉट कॉम (Better.com) या कंपनीनं आपल्या 900 पेक्षा अधिक कर्मचार्यांना मोठा धक्का दिला आहे. वार्षिक सुट्ट्यांच्या अगोदर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विशाल गर्ग यांनी काही कर्मचाऱ्यांची झूम मिटींग घेतली. कोरोना काळातही कृषी आणि प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीत 13 टक्क्यांनी वाढ सीएनएन बिझनेसमधील (CNN Business) बातमीनुसार, बेटर डॉट कॉमचे सीईओ विशाल गर्ग (Vishal Garg) यांनी गेल्या आठवड्यात बुधवारी (1 डिसेंबर 2021) कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला. ‘आत्ता यावेळी झूम कॉलवर उपस्थित असलेले लोक दुर्दैवी आहेत. त्यांना तत्काळ नोकरीवरून काढून टाकलं जात आहे. नोकरी गेल्यानंतर तुम्हाला कुठले आर्थिक लाभ मिळतील याबाबत लवकरच एचआरकडून ईमेल मिळेल’, अशा शब्दांत गर्ग यांनी कर्मचाऱ्यांना नोकरी गेल्याची माहिती दिली. कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेणं कठीण जात आहे. मात्र, लॉकडाऊनच्या संकटामुळं मी देखील हतबल आहे, असंही गर्ग म्हणाले. कंपनीनं कर्मचाऱ्यांवर अनप्रॉडक्टीव्ह असल्याचा ठपका ठेवला आहे. बॅलन्स शीट (Balance sheet) ठीक करणं आणि फोकस्ड वर्कफोर्स (Focused Workforce) तयार करण्याची कारणं देऊन कंपनीनं ही कर्मचारी कपात केली आहे. असं असल तरी, गेल्याच आठवड्यात एका डीलच्या माध्यमातून कंपनीला 750 डॉलर्स मिळाले आहेत. त्यामुळं सध्या कंपनीच्या बॅलन्सशीटमध्ये एक बिलियन डॉलर्सपेक्षा अधिक पैसे शिल्लक आहेत.
फॉर्च्युनमधील (Fortune) वृत्तानुसार, सीईओ विशाल गर्ग यांनी कमी केलेल्या कर्मचार्यांवर अनप्रॉडक्टीव्ह असल्याचा आणि कामचुकारपणाचा आरोप केला आहे. गर्ग यांच्यामते, लॉकडाऊनच्या काळात काही लोकांनी दिवसाचे केवळ दोनच तास काम करून पूर्ण पगार घेतला आहे. विशाल गर्ग यापूर्वी देखील आपल्या वागणुकीमुळं वादात सापडलेले आहेत. एकाच वेळी 900 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचं नेमक कारण विशाल गर्ग यांनाच माहिती. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळं ख्रिसमसच्या तोंडावर शेकडो लोक बरोजगार झाले हे नक्की.