Photo - CGTN
वुहान, 01 जून : कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी त्या डॉक्टरने आपलं लग्न पुढे ढकललं. रुग्णसेवा करताना त्या डॉक्टरला कोरोनाव्हायरसने (coronavirus) विळखा घातला, कोरोनाने त्याचा बळी घेतला. आपल्या होणाऱ्या पत्नीला मागे ठेवून त्याने या जगाचा निरोप घेतला. आज त्या कोरोना योद्धाच्या गोंडस मुलीने या जगात पाऊल ठेवलं आहे.
बीबीसी
च्या मॉनिटरिंग टीमच्या रिपोर्टनुसार चीनमधील डॉ. पेंग यिन्हुआ (Dr. Peng Yinhuas) यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जोडीदाराने एका मुलीला जन्म दिला आहे.
Photo - CGTN
डॉ. पेंग यिन्हुआ कोरोना रुग्णांवर उपचारासाठी झटत होते. ज्या वुहानमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला, तिथल्या रुग्णालयात ते रुग्णांची सेवा करत होते. 1 फेब्रुवारीला त्यांचं लग्न होणार होतं. मात्र कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी त्यांनी आपलं ठरलेलं लग्नही पुढे ढकललं. मात्र कोरोना रुग्णांसाठी कोरोनाशी दोनहात करत असताना डॉ. पेंग यांनाही कोरोनाने विळखा घातला. रुग्णांसाठी कोरोनाशी दोनहात करणारे डॉ. पेंग स्वत: फार दिवस कोरोनाविरोधात लढा देऊ शकले नाही. 20 फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. हे वाचा - Real Fighter..5 महिन्यांचा जीव, 30 दिवस व्हेंटिलेटरवर; अखेर कोरोनाचा लढा जिंकलाच डॉ. पेंग यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यावेळी त्यांची होणारी बायको सहा महिन्यांची गर्भवती होती. डॉ. यिन्हुआ यांच्या मृत्यूला जवळपास 3 महिने होऊन गेलेत. त्यांच्या जोडीदाराची आता प्रसूती झाली. तिनं एका गोंडस मुलीला तिनं जन्म दिला आहे. चीनमध्ये राष्ट्रीय बालदिनी या चिमुरडीचा जन्म झाला. रुग्णसेवा करताना जीव गमावलेल्या या कोरोना योद्धावर आशीर्वादाचा वर्षाव होतो आहे. तिच्या वडिलांनी आपलं आयुष्य कोरोना रुग्णांच्या सेवेत अर्पण केलं. या चिमुरडीला पाहण्यासाठी आज तिचे बाबा या जगात नाहीत. हे वाचा - Coronavirus बदलतोय! प्राणघातक नाही तर कमजोर होतोय; तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिलासा