JOIN US
मराठी बातम्या / विदेश / चार्ल्स शोभराज कोण आहे? अन् त्याची सुटका करण्याचा निर्णय का घेतला गेला?; जाणून घ्या सविस्तर माहिती

चार्ल्स शोभराज कोण आहे? अन् त्याची सुटका करण्याचा निर्णय का घेतला गेला?; जाणून घ्या सविस्तर माहिती

चार्ल्स शोभराज हे नाव अनेकांनी ऐकलेलं असेल किंवा त्याबद्दल वाचलंही असेल. 1970 च्या दशकात संपूर्ण आशिया खंडामध्ये आपली दहशत निर्माण करणारी ही व्यक्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

जाहिरात

चार्ल्स शोभराज कोण आहे? अन् त्याची सुटका करण्याचा निर्णय का घेतला गेला?; जाणून घ्या सविस्तर माहिती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

काठमांडू 22 डिसेंबर : चार्ल्स शोभराज हे नाव अनेकांनी ऐकलेलं असेल किंवा त्याबद्दल वाचलंही असेल. 1970 च्या दशकात संपूर्ण आशिया खंडामध्ये आपली दहशत निर्माण करणारी ही व्यक्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराज याला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगातून मुक्त करण्याचा निर्णय दिला आहे. त्याची तब्येत आणि वय लक्षात घेऊन हा निर्णय घेतला गेला आहे. ‘एएनआय’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

बुधवारी (21 डिसेंबर) नेपाळ सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सपना प्रधान मल्ला आणि तिल प्रसाद श्रेष्ठ यांच्या खंडपीठानं शोभराजला तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्याला ओपन हार्ट सर्जरीची गरज असल्याचं सांगत न्यायालयानं सरकारला हे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा :  Liquor Ban: जगातील असे 10 देश जिथे मद्यपान करणे मोठा गुन्हा; शिक्षा वाचूनच उतरेल

संबंधित बातम्या

शोभराज हा व्हिएतनामी आणि भारतीय वंशाचा आहे. त्याच्याकडे फ्रेंच नागरिकत्व होतं. 1970 च्या दशकात संपूर्ण आशियामध्ये त्याने 20हून अधिक हत्या केल्या होत्या. त्याला ‘बिकिनी किलर’ म्हणूनही ओळखलं जाई. भारतात एका फ्रेंच पर्यटकाला विष देऊन मारल्याप्रकरणी आणि इस्त्रायली नागरिकाची हत्या केल्याप्रकरणी त्याने 21 वर्षे तुरुंगवास भोगलेला आहे.

शोभराज हाँगकाँगमधून बनावट नावाने नेपाळला गेला होता. तेव्हा त्याला पोलिसांनी नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये अटक केली होती. सुमारे तीन दशकांपूर्वी काठमांडू येथील कॅसिनोमधून अटक करण्यात आल्यानंतर 2003 पासून तो नेपाळी तुरुंगात होता. दोन अमेरिकन पर्यटकांच्या हत्येचा आरोप त्याच्यावर होता. सध्या शोभराज 78 वर्षांचा आहे.

जाहिरात

त्यानं वृद्धापकाळाचं कारण देऊन आजीवन कारावासात सूट देण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. खुनाच्या आरोपासाठी शिफारस केलेल्या शिक्षेच्या कालावधीपेक्षा आपल्याला जास्त काळ तुरुंगात ठेवल्याचा दावा शोभराजनं केला आहे. तसा अर्जही यापूर्वी त्यानं दाखल केला होता. त्याचा दावा खरा असल्याचा निष्कर्ष काढून नेपाळ सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं त्याची सुटका करण्याचा निकाल दिला आहे.

जाहिरात

नेपाळमधील मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या आरोपाखाली 19 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या शोभराजनं त्याच्या वकिलामार्फत हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. नेपाळमधील ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या शिक्षेच्या सवलतींचा विचार केल्यास, त्यानं अपेक्षित तुरुंगवास पूर्ण केल्याचा दावा याचिकेत केला गेला होता.

हे ही वाचा :  वयाच्या नवव्या वर्षी 17 फूट खोल तळघरात डांबलं; माती खाऊन जगली 17 दिवस; पुस्तक लिहून सांगितली अपहरणाची कहाणी

जाहिरात

डिसेंबर 1975 मध्ये अमेरिकन नागरिक कोनी जो ब्रॉन्झिच आणि कॅनडाचे नागरिक लॉरेंट कॅरिअर यांच्या हत्येप्रकरणी भक्तपूरच्या (नेपाळ) जिल्हा न्यायालयानं शोभराजला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाच्या निकालानुसार, शोभराजनं 20 वर्षांचा कारावास पूर्ण करण्यासाठी 18 सप्टेंबर 2023 पर्यंत तुरुंगात राहणं अपेक्षित होतं.

गेल्या डिसेंबरमध्ये (2021) शोभराजनं नेपाळ सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. रिट याचिकेत दावा केला होता की, त्यानं त्याच्या 20 वर्षांच्या शिक्षेपैकी 17 वर्षांची शिक्षा आधीच भोगली आहे. ‘ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत’ द्यावी अशी मागणीही त्यानं केली होती. दरम्यान, शिक्षेच्या काळात चांगली वागणूक ठेवल्याबद्दल त्याला सोडण्याची शिफारस आधीच करण्यात आली होती.

जाहिरात

रिट याचिकेनंतर शोभराजला सूट द्यावी की नाही याविषयी न्यायालयानं सरकारला प्रश्न विचारला होता. विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नेपाळ सरकारनं म्हटलं होतं की, शोभराजनं केलेले गुन्हे सूट देण्यायोग्य नाहीत. शिवाय, तो परदेशी नागरिक असल्यानं त्याला नेपाळी नागरिकांना मिळणारी सूट दिली जाणार नाही. “वय, आजार किंवा इतर कारणांमुळे गुन्हेगाराला सूट देण्याची कायद्यात तरतूद नाही. कारावास कमी करता येऊ शकतो. पण, खून, तस्करी, बलात्कार, पलायन इत्यादी गुन्ह्यांमध्ये ही देखील सवलत मिळत नाही,” असं लेखी उत्तर नेपाळ सरकानं न्यायालयाला दिलं होतं.

पण, नेपाळ सर्वोच्च न्यायालयानं शोभराजची प्रकृती आणि वयाच्या कारणास्तव त्याला सोडण्याचा निकाल दिला आहे. याबरोबरच न्यायालयानं त्याच्या हद्दपारीचे आदेशही दिले आहेत. पण, त्याला कोणत्या देशात हद्दपार केलं जाईल, याचा उल्लेख केलेला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या