वॉशिंग्टन, 7 जानेवारी : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली हार आणि जो बायडन यांचा विजय अद्यापही पूर्णपणे स्वीकारलेला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा सपशेल पराभव झाल्यानं त्यांच्या समर्थकांनी संसद भवन आणि व्हाइट हाऊसमध्ये तुफान राडा केला. याच दरम्यान डोनाल्ड ट्रम्प सर्थकांना संबोधित होते. त्यांच्या संबोधनाचा व्हिडीओ युट्यूब, ट्वीटर, फेसबुकवरून हटवण्यात आला आहे. व्हाइट हाऊस आणि संसद भवनात पोलीस आणि ट्रम्प समर्थक यांच्यात झालेल्या हिंसाचारादरम्यान एका महिलेचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ट्वीटरने डोनाल्ड ट्रम यांचं अकाऊंट ब्लॉक केलं आहे. तर त्यांचे शेवटचे तीन ट्वीट डिलीट करण्यात आले आहेत. 12 तासांसाठी ट्रम्प यांचं अकाऊंट ट्वीटरनं ब्लॉक केलं आहे. तर फेसबुक, इन्स्टाग्राम यांनी देखील ब्लॉक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. अमेरिकेतील हिंसाचार प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांनी शेवटचे सोशल मीडियावर केलेले मेसेज देखील हटवण्यात आले आहेत.
हे वाचा- ट्रम्प समर्थकांचा अमेरिकेच्या संसद भवनात हैदोस, गोळीबारात एका महिलेचा मृत्यू डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन पॉलिसिचं उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प यांचं पेज 24 तासांसाठी ब्लॉक केलं आहे. कॅपिटल हिलवर ट्रम्प समर्थकांच्या हिंसाचाराच्या बातमीवर फेसबुक न्यूजरूमने ट्वीट करून याबाबत माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन धोरणांचं उल्लंघन केल्यानं आम्ही त्यांच्यावर हिंसाचाराच्या धोरणाखाली कारवाई करत आहोत. त्यांचं पेज 24 तासांसाठी ब्लॉक करण्यात आलं आहे. तर त्यांनी अपलोड केलेला व्हिडीओ देखील हटवण्यात आला आहे.