न्यूयॉर्क 05 मे: कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगातल्या अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलाय. अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा असं सल्ला दिला जातोय. त्यामुळे सगळे जण घरातूनच काम करण्याला प्राधान्य देत आहेत. कोरोनाविरुद्ध डॉक्टर्स आणि पोलीस हे जसे आघाडीवर काम करत आहेत. तर पत्रकारांना थेट घटनास्थळी जाऊन रिपोर्टिंग करावं लागतं. तर अनेक जणांनी थेट आपल्या घरूनच रिपोर्टिंग करायला सुरूवात केलीय. सकाळी घरातून Live करताना ABC या न्यूज चॅनेलच्या रिपोर्टरची चांगलीच फजिती झाली. कॅमेरा झूम झाला आणि त्याने पॅन्टचं घातली नसल्याचं जगाला दिसलं. विल रिव्ह हा अमेरिकेतल्या ABC या न्यूज चॅनेलचा रिपोर्टर आहे. त्यांच्या “Good Morning America” या शोमध्ये तो लॉकडाऊन नंतरच्या स्थितीविषयी माहिती देत होता. लॉकडाऊनमुळे काही ठिकाणी ड्रोनच्या साह्याने औषधं पोहोचवली जात आहेत अशी सगळे अपडेट्स देत असतानाच एका प्रश्नावर त्याचा कॅमेरा झूम झाला आणि विलची विकेटच पडली. लाईव्हमध्ये त्याने पॅन्टच घातली नसल्याचं दिसून आलं. घरीच असल्याने त्याने लाईव्हच्या आधी तयार होताना फक्त शर्ट आणि त्यावर कोट असा पेहेराव केला होता. कॅमेऱ्यामध्ये तो काही पूर्ण दिसणार नसल्याने त्याने पॅन्ट काही घातली नव्हती. पण कॅमेऱ्याचा अँगल चुकल्याने त्यात त्याचे पायही दिसू लागले. शो करणारे दोघाही अँकर्सला हसू आवरेना. त्याचं लाईव्ह संपल्यावर त्याला फोन यायला सुरूवात झाली आणि नेमकं काय घडलं हे त्याच्या लक्षात आलं.
सोशल मीडियावरही त्याला प्रश्न विचारले जाऊ लागले. लोकांच्या प्रश्नांचा रोख लक्षात घेऊन त्याने त्याला खास उत्तरही दिलं. तुमच्या मनात जसं आहे तसा काही मी बसलो नव्हतो. मी शॉर्ट्स घातली होती. मात्र माझ्या कॅमेरामन मात्र विसरला असंही त्याने बिनधास्तपणे सांगून टाकलं. विलचं हे अनोखं लाईव्ह सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. हेही वाचा - वडिलांनी घरीच प्राण सोडला, वेटिंग असल्याने 19 दिवसांनी झाले अंत्यसंस्कार ‘आम्ही फक्त मरणाची वाट पाहतोय’, या देशात कोरोनाच्या ‘त्सुनामी’ची शक्यता जर्मनीत कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता, जगात 2.50 लाख मृत्यू