JOIN US
मराठी बातम्या / विदेश / संतापजनक! मास्क घालण्यास सांगितले म्हणून प्रवाशांकडून मारहाण, ड्रायव्हरचा मृत्यू

संतापजनक! मास्क घालण्यास सांगितले म्हणून प्रवाशांकडून मारहाण, ड्रायव्हरचा मृत्यू

एका बस ड्रायव्हरचा प्रवाशांनी मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बस ड्रायव्हरने प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक असल्याचे सांगितल्याने त्याच्यावर हल्ला करण्यात आला

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बायोन, फ्रान्स, 11 जुलै : एका बस ड्रायव्हरचा प्रवाशांनी मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बस ड्रायव्हरने प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक असल्याचे सांगितल्याने त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्याचप्रमाणे त्याने या प्रवाशांना तिकिटासंदर्भातील देखील विचारले होते. शुक्रवारी या ड्रायव्हरचा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या 5 दिवस आधी नैऋत्त्य फ्रान्समधील बायोन (Bayonne) याठिकाणी ही घटना घडली. मृत ड्रायव्हरचे नाव Philippe Monguillot असून ते 59 वर्षांचे होते. मीडिया अहवालानुसार फिलीप यांच्यावर 3 प्रवाशांनी हल्ला केला होता. या प्रवाशांनी मास्क घातले नव्हते. कोरोना व्हायरसमुळे फ्रान्समध्ये प्रवास करताना मास्क घालणे बंधनकारक असल्याचे फिलीप यानी फटकारताच तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला. यापैकी 20 वर्षांच्या दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (हे वाचा- ज्यू आणि मुस्लिमांमध्ये कोरोनाचा प्रसार करा; राजकीय पक्षाचं खळबळजनक वक्तव्य ) त्याचप्रमाणे आणखी दोघांवर सदर व्यक्तीस धोक्याच्या काळात मदत न केल्याप्रकरणी आणि पाचव्या व्यक्तीस संशयितांना लपण्यास मदत केल्याचा आरोप आहे. द इंडिपेंडंटने यासंदर्भात वृत्त दिले आहे. बुधवारी बायोनमधील फिलीप यांना पाठिंबा देण्यासाठी सफेद पोशाखात हजारो लोकांनी भाग घेतला होता.

शहराचे महापौर Jean-Rene Etchegaray यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी असे ट्वीट केले आहे की, ‘Philippe Monguillot आता आपल्यात नाहीत. त्यांना काम करताना क्रूर हल्ला झेलावा लागला. सार्वजनिक सेवेचा एक विश्वासू सेवक अशी प्रतिमा सोडून ते गेले आहेत. त्याच्या सहकाऱ्यांच्या, पत्नी आणि कुटुंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत’. फ्रान्सच्या पंतप्रधानांनी या हल्ल्यास भ्याड हल्ला संबोधले आहे. यूरोपियन ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशनने देखील या हल्ल्यानंतर धक्का बसल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर देखील या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या