बर्लिन, 20 फेब्रुवारी : जर्मनीच्या (Germany) दोन बारमध्ये बुधवारी रात्री उशिरा गोळीबार (Firing) झाला आहे. या गोळीबारामध्ये तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जर्मनीच्या स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी शहराच्या शिशा बारमध्ये गोळीबार केला. ही घटना स्थानिक वेळेनुसार रात्री 10 वाजता घडली आहे. घटनेची सूचना मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि संपूर्ण परिसराला घेरलं. सध्या पोलीस चौकशी आणि तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. जर्मन ब्रॉडकास्टर हेसेनशाउने दिलेल्या माहितीनुसार, हनाऊजवळ केसेल्ताद परिसरात बारमध्ये गोळीबार झाला. यामध्ये 3 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही क्षणातच पुन्हा गोळीबार झाला यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला आहे.
इतर बातम्या - कमल हसन यांच्या सिनेमाच्या शूटिंगवेळी अपघात, असिस्टंट डायरेक्टसह 3 जणांचा मृत्यू हनाऊ फ्रॅंकफर्टपासून 25 किमी अंतरावर आहे. इथली लोकसंख्या 100,000 पेक्षा जास्त आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस अधिकारी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दोन्ही भागातील सुरक्षेचे निरीक्षण करत आहेत. तर अधिक तपास सुरू आहे.