JOIN US
मराठी बातम्या / विदेश / बापरे! प्रायव्हेट पार्टच शरीरावेगळा केला; शार्कच्या भयंकर हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

बापरे! प्रायव्हेट पार्टच शरीरावेगळा केला; शार्कच्या भयंकर हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

समुद्रात पोहोता पोहोता तरुण शार्क असलेल्या खतरनाक ठिकाणी पोहोचला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ब्राझिलिया, 16 ऑक्टोबर :  समुद्रात शेकडो जीव राहतात. त्यापैकी काही जीव हे खूपच धोकादायक किंबहुना जीवघेणे असातत. त्यापैकीच एक म्हणजे शार्क मासा. शार्कने माणसांवर हल्ला केल्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. आताही शार्क अटॅकची अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात शार्कने तरुणावर इतका  भयंकर हल्ला केला (Shark Attack) की त्याचा प्रायव्हेट पार्टच (Private Part) शरीरावेगळा केला. यामुळे तरुणाचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमधील ही धक्कादायक घटना आहे. 18 वर्षांच्या मुलावर शार्कने खरतनाक हल्ला केला. समुद्रात पोहोता पोहोता हा तरुण शार्क असलेल्या भागात पोहोचला. तिथं त्याच्यावर शार्कने हल्ला केला. तरुणाच्या प्रायव्हेट पार्टला शार्कने चावा घेतला. त्याचा प्रायव्हेट पार्ट शरीरा वेगळा झाला. शार्क हा प्रायव्हेट पार्ट आपल्या जबड्यातून घेऊन गेली. तरुणाचा रक्तस्राव खूप झाला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. द सनच्या रिपोर्टनुसार जोस अर्नेस्टर डा सिल्वा असं या तरुणाचं नाव आहे. आपल्या घरच्यांना सांगितल्याशिवायच तो पिएडेड बीचवर पोहोचण्यासाठी गेला होता. हे वाचा -  सिंहाच्या जबड्यात माकडीणीचा मृतदेह; रक्तात पिल्लाने आईच्या पोटाला घट्ट कवटाळलं शार्क असलेल्या खतरनाक ठिकाणी तो पोहोचला. लाइफगार्डने त्याला पाहिलं आणि पुन्हा येण्याचा इशारा दिला. तो परतणार तोच त्याच्यावर शार्कने अटॅक केला. त्याला वाचवण्यासाठी लाइफगार्डनी समुद्रात उजडी मारली. अथख प्रयत्नानंतर त्याला शार्कच्या जबड्यातून खेचून काढण्यात आलं. शार्कने त्याचा प्रायव्हेट पार्ट तोडला होता. खूप रक्त वाहत होतं. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. पण रक्त जास्त गेल्याने त्याचा जीव वाचला नाही. हे वाचा -  VIDEO - हातात हात धरून त्याने… ; जीव वाचवणाऱ्या माणसांचे कांगारूने मानले आभार काही महिन्यांपूर्वी एका तरुणीवरही समुद्रात शार्कने केलेल्या हल्ल्याचा एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  हा व्हिडीओ नादी अल तखीम नावाच्या एका ट्वीटर युजरने आपल्या अकाउंटवरून शेअर केला होता.

संबंधित बातम्या

व्हिडीओमध्ये एक तरुणी खोल समुद्रात पोहण्याचा आनंद घेताना दिसते. त्याचवेळी बाहेर उभे असलेले लोक तिला, शार्क तिच्याजवळ येत असल्याची सूचना देतात. हे ऐकून तरुणी घाबरते आणि किनाऱ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू लागते. काही वेळातच शार्क तिच्याजवळ येत असल्याचं ती स्वत: पाहते आणि जोरजोरात ओरडू लागते. त्यानंतर शार्क कदातिच तिचे पाय पकडून तिला खेचू लागतो. यावेळी अनेकदा तरुणी पाण्यात डुबत असल्याचंही व्हिडीओत दिसतंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या