JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Beirut Blast: बैरूतमध्ये झाला अणुबॉम्ब हल्ला? वाचा काय आहे या VIDEO मागचं सत्य

Beirut Blast: बैरूतमध्ये झाला अणुबॉम्ब हल्ला? वाचा काय आहे या VIDEO मागचं सत्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हा स्फोट नसून बॉम्ब हल्ला झाल्याचे म्हटले होते. मात्र आता पहिल्यांदाच बैरूतमध्ये झालेल्या स्फोटामागचे सत्य समोर आले आहे.

जाहिरात

यानंतर भारतात ठिकठिकाणी स्टोअर केलेल्या केमिकलबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यामध्ये चेन्नईच्या बाहेर 700 टन स्टोअर अमोनियम नायट्रेटबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बैरुत, 5 ऑगस्ट : लेबननची (Lebanon) राजधानी बैरुतमध्ये (Beirut blasts) मंगळवारी सायंकाळी एक मोठा स्फोट झाला. हा स्फोटाची भीषणता इतकी होती की, तब्बल 10 मैलपर्यंतचा परिसर हादरला. दरम्यान हा स्फोट झाल्यानंतर हा अणुबॉम्ब हल्ला (Nuclear blast) असल्याचे सांगितले जात होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनीही हा स्फोट नसून बॉम्ब हल्ला झाल्याचे म्हटले होते. मात्र आता पहिल्यांदाच बैरूतमध्ये झालेल्या स्फोटामागचे सत्य समोर आले आहे. बैरूतमध्ये स्फोट झाल्यानंतर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही व्हिडीओमध्ये हा अणुबॉम्ब हल्ला असल्याचे सांगितले होते. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार हा अणुबॉम्ब हल्ला नसून अमोनियम नायट्रेटचा (ammonium nitrate ) स्फोट झाल्याचे समोर आले आहे. लेबननच्या स्वाथ्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात आतापर्यंत 73 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 4000 लोकं जखमी झाले आहेत. वाचा- Beirut Blast: 12 सेकंदात उद्धवस्त झालं शहर! 73 जणांचा मृत्यू 4000 लोकं जखमी, पाहा धडकी भरवणारा VIDEO

लेबननचे पंतप्रधान हसन डायब यांनी बुधवारी राष्ट्रीय शोक दिन जाहीर केला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की एका गोदामात एक प्रचंड मोठ्या प्रमाणात स्फोटक मटेरियल स्टोअर होते आणि तेथे स्फोट झाला. राष्ट्रपती मायकेल इऑन यांनी ट्विट केले आहे की 2,750 टन स्फोटक नायट्रेट असुरक्षित पद्धतीने साठवले गेले होते. हा स्फोट कसा झाला याचा तपास सुरू आहे. वाचा- सोशल मीडियावर VIRAL झालेल्या बैरूतच्या स्फोटाचं कारण उघड; शहराची काय स्थिती झाली

वाचा- बैरूतमधल्या भीषण स्फोटाचा LIVE VIDEO झाला VIRAL, शेकडो जखम 2014पासून गोदामात होती स्फोटकं बैरूतमध्ये झालेला स्फोट नायट्रेटमुळे झाला असावा असे सांगण्यात आले आहे. या गोदामात 2014 पासून एक स्फोटक स्टोअर असल्याचे सांगितले जात आहे. वृत्तसंस्था एएफपीला एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, की आसपासची सर्व इमारती कोसळल्या आहेत. सायप्रसपासून सुमारे 240 किलोमीटर दूर पूर्वेच्या भूमध्य भागात स्फोटाचा आवाज ऐकू आला. गृहमंत्र्यांनी घटनेविषयी स्थानिक माध्यमांना सांगितले की, बंदरावर मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट आहे. लेबनीज कस्टमची याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे की बंदरात इतक्या मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट काय करीत आहे? दुसरीकडे, लेबनीजचे प्रसारक मायडेन यांनी कस्टम संचालकांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की सुमारे एक टन नायट्रेटचा स्फोट झाला असावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या