बैरुत, 5 ऑगस्ट : लेबननची (Lebanon) राजधानी बैरुतमध्ये (Beirut blasts) मंगळवारी सायंकाळी एका मोठा स्फोट झाला. या स्फोटाची भीषणता इतकी होती की, तब्बल 10 मैलपर्यंतचा परिसर हादरला. असे सांगितले जात आहे की, जहाजमध्ये असलेल्या फटाक्यांचा स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यात तीन मजल्यांपर्यंत वर उडाल्या. लेबननच्या स्वाथ्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात आतापर्यंत 73 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 4000 लोकं जखमी झाले आहेत. लेबननचे पंतप्रधान हसन डायब यांनी बुधवारी राष्ट्रीय शोक दिन जाहीर केला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की एका गोदामात एक प्रचंड मोठ्या प्रमाणात स्फोटक मटेरियल स्टोअर होते आणि तेथे स्फोट झाला. राष्ट्रपती मायकेल इऑन यांनी ट्विट केले आहे की 2,750 टन स्फोटक नायट्रेट असुरक्षित पद्धतीने साठवले गेले होते. हा स्फोट कसा झाला याचा तपास सुरू आहे. या स्फोटाचा भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, यात लोकांचे मृतदेह रस्त्यावर विखुरलेले दिसत आहे. वाचा- सोशल मीडियावर VIRAL झालेल्या बैरूतच्या स्फोटाचं कारण उघड; शहराची काय स्थिती झाली
सेंट्रल बैरूतमध्ये संध्याकाळी दोन मोठे स्फोट झाले. लेबननमध्ये असणाऱ्या भारतीयांसाठी भारतीय दूतावासाने मदतीचे फोन क्रमांक दिले आहेत. या परिस्थितीत सगळ्यांनी शांत राहावं, असं आवाहनही करण्यात आहे.
वाचा- बैरूतमधल्या भीषण स्फोटाचा LIVE VIDEO झाला VIRAL, शेकडो जखम 2014पासून गोदामात होती स्फोटकं बैरूतमध्ये झालेला स्फोट नायट्रेटमुळे झाला असावा असे सांगण्यात आले आहे. या गोदामात 2014 पासून एक स्फोटक स्टोअर असल्याचे सांगितले जात आहे. वृत्तसंस्था एएफपीला एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, की आसपासची सर्व इमारती कोसळल्या आहेत. सायप्रसपासून सुमारे 240 किलोमीटर दूर पूर्वेच्या भूमध्य भागात स्फोटाचा आवाज ऐकू आला. गृहमंत्र्यांनी घटनेविषयी स्थानिक माध्यमांना सांगितले की, बंदरावर मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट आहे. लेबनीज कस्टमची याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे की बंदरात इतक्या मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट काय करीत आहे? दुसरीकडे, लेबनीजचे प्रसारक मायडेन यांनी कस्टम संचालकांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की सुमारे एक टन नायट्रेटचा स्फोट झाला असावा.