JOIN US
मराठी बातम्या / विदेश / My Love, My Partner... बराक ओबामांकडून मिशेल यांना वाढदिवसाच्या बहारदार शुभेच्छा

My Love, My Partner... बराक ओबामांकडून मिशेल यांना वाढदिवसाच्या बहारदार शुभेच्छा

मिशेल ओबामा यांच्या 58 व्या वाढदिवशी पती बराक ओबामा यांनी त्यांना हटके स्टाईलनं शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 18 जानेवारी: अमेरिेकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी त्यांची पत्नी आणि अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी (Ex First Lady) मिशेल ओबामा (Michelle Obama) यांना वाढदिवसाच्या एकदम हटके शुभेच्छा (Birthday Wishes) दिल्या आहेत. मिशेल ओबामा यांचा आज 58 वा वाढदिवस (58th Birthday) आहे. यानिमित्त बराक ओबामा यांनी ट्विटरवरून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जगातील अनेकांचा आदर्श असणारं हे जोडपं एकमेकांचे वाढदिवस कशा पद्धतीनं साजरं करतं, हे पाहणं अनेकांसाठी आनंददायी ठरलं.   अशा दिल्या शुभेच्छा मिशेल ओबामा यांच्या 58 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बराक ओबामांनी ट्विटरची निवड केली. ट्विटरवर त्यांनी लिहिलं, ‘’हॅप्पी बर्थडे मिशेल. माझं प्रेम, माझी पार्टनर आणि माझी मैत्रिण…’’. या संदेशासोबतच त्यांनी मिशेल ओबामा यांच्यासोबत केक कापतानाचा फोटोदेखील ट्विट केला आहे. या मेसेजला आतापर्यंत लाखो चाहत्यांनी लाईक केलं असून शुभेच्छांचा ऑनलाईन वर्षाव सुरू आहे.  

संबंधित बातम्या

मिशेलनी दिलं उत्तर टेक्स्ट, ईमेल, सोशल मीडिया यापैकी कुठल्याही माध्यमातून बराक यांच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा या नेहमीच आपल्यासाठी खास असल्याचं मिशेल यांनी म्हटलं आहे. आगामी वर्षात काय नव्या गोष्टी समोर येतात, ते पाहण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असंही मिशेल यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.   हे वाचा -

बराक-मिशेल केमिस्ट्री एक उत्तम राज्यकर्ता म्हणून आपलं कर्तृत्व सिद्ध करणारे बराक ओबामा हे एक उत्तम पती असल्याचं आणि बराक-मिशेल ही जोडी एक आदर्श कपल असल्याचं यापूर्वी वारंवार दिसून आलं आहे. दोघंही शक्य तेवढा वेळ एकमेकांसोबत राहणं पसंत करतात आणि वेळोवेळी सोशल मीडियातून व्यक्त होत सामान्य नागरिकांना प्रेरणा देण्याचं काम करत असतात. यापूर्वीदेखील दोघांनी वेगवेगळ्या प्रसंगी एकमेकांसोबतचं ट्युनिंग दाखवून दिलं असून ते नेहमीच जनतेच्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या