JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Baba vanga | 'बाबा वेंगा'चं आणखी एक भाकित खरं होण्याची शक्यता, म्हणाले होते रशिया..

Baba vanga | 'बाबा वेंगा'चं आणखी एक भाकित खरं होण्याची शक्यता, म्हणाले होते रशिया..

बाबा वेंगा (Baba vanga) त्यांच्या भविष्यवाणीसाठी जगभर प्रसिद्ध होते. त्यांची अनेक भविष्यवाणी खरी ठरली, पण अनेक वेळा ती चुकीचीही ठरली. मृत्यूपूर्वी त्यांनी रशियासाठी (Russia) एक भविष्यवाणी केली होती, जी आता खरी ठरताना दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मॉस्को, 28 फेब्रुवारी : सध्या विज्ञानाचं युग आहे. माणसांनी विज्ञानाच्या (Science) आधारे इतकी प्रगती केली आहे की, आता तो थेट सूर्याच्या वातावरणातील स्थितीची निरीक्षणं नोंदवू लागला आहे. तरीदेखील कधीनाकधी माणसाला भविष्य (Future), ज्योतिषशास्त्र (Astrology), अंकशास्त्र (Numerology) यासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवावासा वाटतो. काही लोक तर आपल्या दिवसाची सुरुवातच राशी भविष्य वाचून करतात. आपला दिवस कसा जाईल? ही उत्सुकता त्यामागे असते. लोकांची ही उत्सुकता शमवण्याचं काम ज्योतिषी किंवा भविष्यवेत्ते करत असतात. आतापर्यंत जगात अनेक दिग्गज भविष्यवेत्ते होऊन गेले आहेत. त्यांनी केलेल्या भाकितांमुळे त्यांना जगभर ओळखलं जातं. बल्गेरियातील (Bulgaria) बाबा वेंगा (Baba Vanga) यांचादेखील समावेश अशा लोकांमध्ये होतो. बाबा वेंगा या नावानं प्रसिद्ध असलेल्या वांगेलिया पांडावा गुस्तेरोव्हा (Vangelia Pandava Gusterova) यांनी रशियाबद्दल केलेली आश्चर्यकारक भविष्यवाणी (Prophecy) सध्या चर्चेत आली आहे. दृष्टीहीन असलेल्या बाबा वेंगा यांनी आपल्या मृत्यूपूर्वीच जगाच्या भविष्याबद्दल अनेक गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. आजतकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. रिपोर्ट्सनुसार, बाबा वेंगा यांनी भाकीत (Prediction) केलं होतं की, ‘रशिया ‘जगाचा स्वामी’ होईल. युरोप (Europe) नापीक (Barren) होईल आणि त्यानंतर रशियाला (Russia) कोणीही रोखू शकणार नाही. सर्व काही बर्फाप्रमाणं वितळून जाईल आणि फक्त व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) व रशियाचं वैभव शिल्लक राहील. कुणीही रशियापुढे येणार नाही व तो जगावर राज्य करेल.’ सध्या सुरू असलेल्या युक्रेन-रशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगाचं हे भाकीत चर्चेत आलं आहे. असं म्हणतात की, बाबा वेंगा यांनी आपल्या मृत्यूपूर्वी 5079 पर्यंतची भविष्यवाणी केलेली आहे. काही रिपोर्टनुसार, त्याच्या भाकितांपैकी 85 टक्के भाकितं खरी ठरली आहेत. युक्रेनच्या आकाशात उडतंय ‘भूत’! 6 रशियन लढाऊ विमाने पाडली, पाहा व्हिडिओ रिपोर्टनुसार, बाबा वेंगा यांनी 2004मधील त्सुनामीबाबत (Tsunami) भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली. यानंतर त्यांनी 2021साठी टोळधाडीची (Locusts) भविष्यवाणी केली होती. गेल्यावर्षी भारतात टोळांच्या हल्ल्यामुळे हजारो हेक्टर पिकं उद्ध्वस्त झाली होती. अमेरिकेचे 44वे राष्ट्रपती (US President) कृष्णवर्णीय असतील आणि ते तिथले शेवटचे राष्ट्रपती असतील, असंही बाबा वेंगा म्हणाले होते. त्यांचं हे भाकीत 50टक्के खरं ठरलं. कारण, अमेरिकेचे 44वे राष्ट्रपती कृष्णवर्णीय होते पण, ते शेवटचे राष्ट्रपती नव्हते. रशियाने दिली ISS खाली पाडण्याची धमकी! अमेरिका झुकेल का? जाणून घ्या 5 पॉईंटमध्ये आपल्या भाकितांसाठी प्रसिद्ध असलेल्या बाबा वेंगा यांचा जन्म 1911 मध्ये झाला होता. वयाच्या 12व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली होती. बल्गेरियाचे नागरिक असलेले बाबा वेंगा फकीर होते. त्यांनी केलेल्या भाकितांपैकी काही खरी तर काही खोटी ठरली आहेत. विशेष म्हणजे त्यांनी ही भाकितं कुठेही लिहून ठेवलेली नाहीत. त्यांच्या अनुयायांनी केलेल्या तोंडी प्रसारामुळे त्या माहिती होत आहेत. 1996 मध्ये बाबा वेंगा यांचा मृत्यू झाला. युक्रेन-रशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगांची भविष्यवाणी खरी ठरते की काय, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या