मेक्सिको, 10 डिसेंबर: अमेरिकन देश मेक्सिकोच्या (Mexico) दक्षिण भागातून एका भीषण अपघाताची (tragic accident) बातमी समोर आली आहे. गुरुवारी झालेल्या एका रस्ता अपघातात 49 जणांचा मृत्यू (49 people were killed) झाल्याची बातमी समोर येत आहे. वृत्तसंस्थेनुसार, दक्षिण मेक्सिकोच्या चियापास प्रांतातून जात असलेला ट्रक वळणावर उलटल्याने हा अपघात झाला. या ट्रकमध्ये 100 हून अधिक लोक उपस्थित होते, त्यापैकी बहुतेक मध्य अमेरिकन देशांतील स्थलांतरित होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी 58 जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. हेही वाचा- बड्या राजकीय नेत्याकडून तरुणीचं आयुष्य उद्धवस्त, लग्नानंतरही देत राहिला नरक यातना; 4 वर्षांपासून सुरू होता भयावह प्रकार स्थानिक प्रशासनानं जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मध्य अमेरिकन देशांच्या गरिबी आणि हिंसाचारापासून वाचण्यासाठी स्थलांतरित मेक्सिकोमार्गे अमेरिकेच्या सीमेवर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. सुमारे 40 जखमी गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. म्हणजेच ट्रकमध्ये जवळपास 107 जण होते. राज्याची राजधानी चियापासकडे जाणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला. घटनास्थळावरील फोटोंमध्ये अपघातग्रस्त व्यक्ती फुटपाथवर आणि ट्रकच्या मालवाहू डब्यात विखुरलेले दिसत आहे. पीडित होते मध्य अमेरिकेतील स्थलांतरित पीडित मध्य अमेरिकेतील स्थलांतरित असल्याचं माहिती समोर आली आहे. मात्र त्यांच्या राष्ट्रीयत्वाची अद्याप पुष्टी झाली नाही. चियापास राज्य नागरी संरक्षण कार्यालयाचे प्रमुख लुईस मॅन्युएल मोरेनो यांनी सांगितले की, वाचलेल्यांपैकी काहींनी सांगितले की ते शेजारच्या ग्वाटेमालाचे आहेत.