JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Iphone मधून सोशल मीडियावर लीक झाले न्यूड फोटो, Apple तरुणीला देणार करोडोंची भरपाई

Iphone मधून सोशल मीडियावर लीक झाले न्यूड फोटो, Apple तरुणीला देणार करोडोंची भरपाई

मुलीने आयफोन खराब झाल्यावर तो दुरुस्तीसाठी दिला होता, त्यादरम्यान तिची नग्न छायाचित्रे सोशल मीडियावर लीक (Nude Photos Leak on Social Media) झाली. तिनं कंपनीकडून सुमारे 36,61,59,000 रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 13 जून : आयफोन बनवणारी जगातील आघाडीची टेक कंपनी Apple आता आपल्या चुकीमुळे एका मुलीला कोट्यावधी रुपये देणार आहे. खरं तर, मुलीने आयफोन खराब झाल्यावर तो दुरुस्तीसाठी दिला होता, त्यादरम्यान तिची नग्न छायाचित्रे सोशल मीडियावर लीक (Nude Photos Leak on Social Media) झाली. आता मुलीने कंपनीकडून 5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 36,61,59,000 रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. अॅपल कंपनी 21 वर्षीय विद्यार्थीनीसोबत बातचीत करुन लाखो डॉलरची भरपाई देण्यास तयार झाली आहे. द टेलीग्रामच्या रिपोर्टनुसार, महिलेनं कॅलिफोर्नियामध्ये आपला आयफोन एक स्टोरमध्ये दुरुस्तीसाठी दिला होता. पेगाट्रॉन नावाच्या Apple कंपनीच्या कंत्राटदाराद्वारे हे दुकान चालवले जात होते. स्टोरमध्ये तिचा मोबाईल रिपेयर करणाऱ्या व्यक्तीनं तरुणीच्या फेसबुक पेजवर न्यूड फोटो आणि एक व्हिडिओ पोस्ट केला होता. आज डोंबिवलीत 1 रुपया प्रतिलिटर मिळणार पेट्रोल, जाणून घ्या कसं? हे फोटो आणि व्हिडिओ पाहून लोकांना असं वाटलं, की या तरुणीनंच हे अपलोड केलं आहे. मात्र, तरुणीच्या मित्र-मैत्रीणींनी हे फोटो पाहिल्यानंतर त्यांनी तिला याबाबतची माहिती दिली आणि तिनं हे फोटो डिलीट केले. या विद्यार्थीनीच नाव गुपित ठेवण्यात आलं आहे. संबंधित स्टोरवर कारवाई करत कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे. हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, की तरुणीला अॅपल कंपनीकडून किती भरपाई हवी होती. मात्र, विविध मीडिया रिपोर्टमध्ये याला कायदेशीर लढाईचा हवाला देण्यात आला आहे. तरुणीच्या वकिलांनी या घटनेमुळे झालेल्या भावनिक त्रासासाठी कंपनीकडे 5 दशलक्ष डॉलर्सची मागणी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या