ह्यूस्टन, 06 नोव्हेंबर: अमेरिकेतील दक्षिणेकडील ह्यूस्टन राज्यातील अॅस्ट्रोवर्ल्ड म्युझिक फेस्टिव्हलदरम्यान आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ह्यूस्टन अग्निशमन विभागाचे प्रमुख सॅम्युअल पे यांनी अपघाताची माहिती देताना सांगितले की, या घटनेचे कारण अद्याप समजलेले नाही. पेन्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आजच्या घटनेत किमान आठ जणांचा मृत्यू आणि डझनभर लोक जखमी झाल्याची पक्की माहिती आमच्याकडे आहे.’ त्यांनी अशी माहिती दिली की, त्यांना प्राथमिक चौकशीत अशी माहिती मिळाली आहे की याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी स्टेजच्या दिशेने सरकत होती आणि यामुळे चेंगराचेंगरी झाली. याठिकाणी चेंगराचेंगरीमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि अनेकजण जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 जणांना रुग्णालयात भरती करण्याच आले आहेत. यापैकी 11 जणांन हृदयविकाराचा झटका आल्याचीही माहिती मिळते आहे. बातमी अपडेट होत आहे