Washington: President Donald Trump talks to the media as he leaves the White House, Friday, Feb. 28, 2020 in Washington, on his way for a short stop at Andrews Air Force Base to board Air Force One for a campaign rally in North Charleston, S.C., for a campaign rally.AP/PTI(AP2_29_2020_000017B)
वॉशिंग्टन, 20 मे : जगात कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत (America) आहेत. त्याबाबत सर्व जण चिंता व्यक्त करत आहेत. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी याबाबत विचित्र प्रतिक्रिया दिली आहे. जगभरात कोरोनाव्हायरसमुळे अमेरिका सर्वात जास्त प्रभावित आहे, ही सन्मानाची बाब आहे, असं अजब विधान ट्रम्प यांनी केलं आहे. बीबीसी च्या एका रिपोर्टनुसार व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प म्हणाले, “देशात कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीकडे मी वेगळ्या दृष्टिने पाहतो. कोरोनाची प्रकरणं वाढत आहे, याला मी चांगलं मानतो. कारण प्रकरणं जास्त आहेत याचा अर्थ आम्ही जास्तीत जास्त लोकांची टेस्ट केली आहे” हे वाचा - जुळ्या बहिणी…एकत्र राहूनही एक कोरोना संक्रमित तर दुसरी ठणठणीत; डॉक्टरही हैराण सर्वात जास्त कोरोनाव्हायरसची प्रकरणं असलेल्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. आतापर्यंत अमेरिकेत 1,571,328 कोरोना रुग्ण आहेत, तर 93,561 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी ट्र्म्प यांनी कॅबिनेट मीटिंग घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांना ते म्हणाले, “तुम्ही लोकं म्हणता की, अमेरिकेत कोरोना संक्रमणाची सर्वात जास्त प्रकरणं आहेत. आम्ही लोकं याबाबतीत टॉपवर आहोत. कारण इतर देशांच्या तुलनेत आमच्या देशात जास्त टेस्ट करण्यात आलेत. त्यामुळे जर आपण जास्त प्रकरणांबाबत बोलत असू तर मी त्याचं वाईट मानून घेत नाही, तर त्याच्याकडे मी एक सन्मान म्हणून पाहतो. याचा अर्थ आमच्याकडे टेस्टिंग चांगली होते आहे. त्यामुळेच मी म्हणतो ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे, निश्चितच सन्मानाची बाब आहे” हे वाचा - वर्षभरात कोरोना व्हायरस होणार नष्ट, 6 महिन्यांमध्ये येणार बाजारात औषध! ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर अमेरिकेच्या डेमोक्रेटिक नॅशनल कमिटीनं त्यांच्यावर टीका केली आहे. अमेरिकेत कोरोना संक्रमितांची 15 लाख प्रकरणं नेतृत्व अपयशी ठरत असल्याचं दाखवत आहेत, असं ट्विट या कमिटीनं केलं आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड