JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Nasa Moon Rocket: ‘नासा’ चंद्रावर स्वारी करण्यासाठी पुन्हा सज्ज, 'मून रॉकेट'चे आज उड्डाण

Nasa Moon Rocket: ‘नासा’ चंद्रावर स्वारी करण्यासाठी पुन्हा सज्ज, 'मून रॉकेट'चे आज उड्डाण

नासाच्या ‘अपोलो’ मोहिमेनंतर सुमारे अर्ध्या शतकानंतर चंद्राच्या कक्षेत ‘क्रू कॅप्सूल’ पाठवण्याची ही तयारी आहे. अपोलो मोहिमेदरम्यान 12 अंतराळवीर चंद्रावर उतरले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

न्यूयॉर्क, 29 ऑगस्ट : अमेरिकी अंतराळ संस्था (American space agency) ‘नासा’ने (NASA) पुन्हा एकदा चांद्र मोहीम हाती घेतली आहे. अंतराळवीरांना चंद्रापर्यंत पोहचण्यासाठी शक्तीशाली रॉकेट (powerful rocket) तयार करण्यात आलंय. सोमवारी (29 ऑगस्ट 22) हे ‘मून रॉकेट’ (moon rocket) उड्डाण करण्याची शक्यता आहे. प्रक्षेपणस्थळी (launch site) वीज पडण्याची घटना घडली असली तरी, नासाचं ‘मून रॉकेट’ रवाना होण्याच्या मार्गावर असल्याने हे उड्डाण यशस्वी होतं का, याकडे जगभरातील अनेकांचं लक्ष लागलंय. दुसरीकडे, चांद्र मोहिमसाठी नासाने तयार केलेलं 322 फूट अंतराळ प्रक्षेपण प्रणाली रॉकेट सर्वांत शक्तिशाली रॉकेट आहे. नासाच्या ‘अपोलो’ मोहिमेनंतर सुमारे अर्ध्या शतकानंतर चंद्राच्या कक्षेत ‘क्रू कॅप्सूल’ पाठवण्याची ही तयारी आहे. अपोलो मोहिमेदरम्यान 12 अंतराळवीर चंद्रावर उतरले होते. मून रॉकेटचे सहा आठवड्यांचे हे चाचणी उड्डाण चांगले झाले, तर काही वर्षांत अंतराळवीर चंद्रावर परत जाऊ शकतात. मात्र, नासाच्या अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, यामध्ये धोका जास्त असून उड्डाणाचा कालावधी कमी होऊ शकतो. तसंच नासाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितलं की, शनिवारी आलेल्या वादळात नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमध्ये असलेल्या रॉकेट आणि कॅप्सुलचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. इतर उपकरणांचं नुकसान झालं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. नासाचं महत्त्वाचं पाऊल नासाची ‘आर्टेमिस-1’ (Artemis-1) मोहीम जवळपास अर्धशतकानंतर मानवाला चंद्रावर नेऊन परत आणण्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. हे रॉकेट 29 ऑगस्ट 2022 रोजी पाठवलं जाणार आहे, आणि नासाच्या अंतराळ प्रक्षेपण प्रणाली व ओरियन क्रू कॅप्सूलसाठी हा एक महत्त्वाचा प्रवास असणार आहे. हे अंतराळयान चंद्रावर जाईल, काही लहान उपग्रहांना कक्षेत सोडेल आणि स्वतःला एका कक्षेत ठेवेल. या मोहिमेद्वारे नासाचं उद्दिष्ट अंतराळयानाच्या ऑपरेशनचं प्रशिक्षण घेणं, आणि चंद्राभोवती अंतराळवीरांनी अनुभवलेल्या परिस्थितीची तपासणी करणं, हे आहे. दरम्यान, नासाच्या ‘अपोलो’ मोहिमेअंतर्गत 1969-72 या कालावधीत नासाचे अंतराळवीर हे चंद्रावर जाऊन आले होते. तेव्हा चंद्रावरील माती-दगड हे पृथ्वीवर आणण्यात आले होते. त्यातच आता नासाने पुन्हा एकदा चांद्र मोहीम हाती घेतली आहे. यासाठी चंद्रापर्यंत अंतराळवीरांना पोहचण्यासाठी शक्तीशाली रॉकेट तयार करण्यात आले आहे. ही मोहीम यशस्वी व्हावी, यासाठी नासाची टीम प्रयत्न करीत आहे. तसंच जगाचं लक्षसुद्धा या मोहिमेकडे लागलं असून, नासाची ही मोहीम यशस्वी होते का, याची उत्सुकता अनेकांना आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या