JOIN US
मराठी बातम्या / विदेश / चीननं असा पसरवला जगभरात कोरोना, अमेरिकेला मिळाला सर्वात मोठा पुरावा

चीननं असा पसरवला जगभरात कोरोना, अमेरिकेला मिळाला सर्वात मोठा पुरावा

मेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी विषाणूची लागण चीनच्या लॅबमधून पसरल्याचा मोठा पुरावा मिळाला असल्याचे सांगितले.

जाहिरात

भारतात 5 मोठ्या कंपन्या कोविड-19च्या लशीवर काम करत आहेत. त्यातल्या 3 कंपन्यांचं संशोधन प्रगतीपथावर असून आशा निर्माण झाल्या आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 04 मे : चीनच्या वुहानपासून कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर चीननं मुद्दाम हा व्हायरस पसरवल्याचे आरोपही अमेरिकेसह अनेक देशांनी केले. मात्र याबाबत कोणतेही ठोस पुरावे मिळाले नव्हते. मात्र आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी विषाणूची लागण चीनच्या लॅबमधून पसरल्याचा मोठा पुरावा मिळाला असल्याचे सांगितले. मात्र माइक यांनी माध्यमांना कोणतेही पुरावे दिले नाहीत. जगातील अनेक देश वुहानमधील चिनी प्रयोगशाळांकडे संशयानं पाहत आहेत. या प्रयोगशाळेत कोरोना विषाणूवर संशोधन करण्यात आल्याचे आरोपही करण्यात आले होते, मात्र चीनने असे सर्व आरोप फेटाळून लावले होते.  आता पहिल्यांदाच अमेरिकेनं चीननं कोरोना पसरवल्याचे पुरावे असल्याचे सांगितले. वाचा- मजूर, कामगारांकडून तिकीट आकारू नका, मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे विनंती एबीसी न्यूजनं घेतलेल्या मुलाखतीत माइक पोम्पियो यांनी, चीनवर कोरोना पसरवल्याचा आरोप करत पुराव्याबाबतही सांगितले. याआधी त्यांनी सांगितले होते की, अमेरिका चीनच्या वुहानमधील लॅबमधून कोरोना कसा पसरला याचा शोध घेत आहे. माइक यावेळी असेही म्हणाले की, “आम्हाला सर्वात मोठा पुरावा मिळाला आहे. मी तुम्हाला सांगतो की वुहानमधील लॅबमध्ये कोरोनावर संशोधन सुरू असताना हा व्हायरस पसरला. चीननं याबाबत सर्व माहिती लपवली. त्याचा परिणाम आता साऱ्या जगाला भोगावे लागत आहे”. वाचा- लॉकडाऊनमुळे ‘कभी खुशी कभी गम’, मूड स्विंग असा करा दूर theguardian.comने दिलेल्या वृत्तानुसार, माइक यावेळी काहीसे गोंधळलेले दिसत होते. त्यांनी असेही सांगितले की, कोरोनाव्हायरस हा तयार करण्यात आला आहे हे सगळ्यांना ठावूक आहे. आमच्याकडे पुरावे आहेत, त्यामुळं आम्ही दाव्यानिशी हे बोलू शकतो. दरम्यान, याआधी अमेरिकेच्या इंटेलिजेंसने हा विषाणू मानव निर्मित नसल्याचे विधान केले होते. त्यामुळं माइक यांच्या वक्तव्यांमुळं खळबळ माजली आहे. वाचा- …तर वर्षाअखेरीस मिळणार कोरोनाची लस, ट्रम्प यांचा सर्वात मोठा दावा याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही असाच दावा केला आहे. ट्रम्प यांनी असे म्हटले होते की व्हायरसच्या प्रसाराबद्दल आपण चीनी लॅबकडून पुरावे पाहिले आहेत, परंतु ते आम्ही सध्या कोणाला सांगू शकत नाही. यामुळं अमेरिकेकडे जर पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावे, असी मागणी काही देशातील संशोधकांनी केली आहे. संपादन, संकलन-प्रियांका गावडे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या