JOIN US
मराठी बातम्या / विदेश / इटलीत अमेझॉनला मोठा झटका, बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल तब्बल 130 कोटी डॉलरचा दंड

इटलीत अमेझॉनला मोठा झटका, बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल तब्बल 130 कोटी डॉलरचा दंड

व्यवसायात नैतिकता न पाळल्याचा ठपका ठेवत इटलीतील प्रशासनानं अमेझॉन कंपनीला तब्बल 130 कोटी डॉलरचा भरभक्कम दंड ठोठावला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मिलान, 9 डिसेंबर: इटलीतील (Italy) प्रशासनानं अमेझॉन कंपनीला (Amazon) तब्बल 130 कोटी डॉलरचा ($1.3 billion) दंड ठोठावला आहे. उद्योगातील नैतिकता धाब्यावर बसवत (Third party seller) छोट्या उद्योजकांना देशोधडीला लावणारी बेकायदेशीर कृत्यं केल्याचा ठपका ठेवत हा दंड आकारण्यात आला आहे. भारतात अमेझॉनविरोधात व्यापारी आवाज उठवत असताना आता युरोपातदेखील अमेझॉननं अनेक बेकायदा कृत्यं केल्याचं समोर येत आहे. काय आहे प्रकरण? इटलीमध्ये व्यवसाय करणाऱ्या अमेझॉन कंपनीनं थर्ड पार्टी सेलर्सना अनैतिक पद्धतीनं आपला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याचा ठपका कंपनीवर ठेवण्यात आला आहे. इटलीत अँटिट्रस्ट रेग्युलेटर नावाची यंत्रणा आहे. या यंत्रणेनं केलेल्या चौकशीत अमेझॉननं छोट्या व्यापाऱ्यांना नुकसान पोहोचेल, अशा अनेक कृती केल्याचं दिसून आलं आहे. प्रत्यक्षात जे विक्रेते अमेझॉनसोबत नाहीत, त्यांना आपली सर्व यंत्रणा वापरायला दिल्याचा ठपका अमेझॉनवर आहे. या प्रकारात थर्ड पार्टी व्यापाऱ्यांनी अमेझॉनचे गोडाऊन आणि त्यांची कुरिअर यंत्रणा वापरून छोट्या व्यापाऱ्यांशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्यक्षात जी उत्पादनं अमेझॉनसोबत नाहीत, त्यांना स्वतःचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्यामुळे इतर उद्योजकांना त्याचा फटका बसल्याचा आरोप इटलीमध्ये प्रथमदर्शनी सिद्ध झाला आहे. त्याची शिक्षा म्हणून अमेझॉनला तब्बल 130 कोटी डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. अधिकारी ठेवणार लक्ष अमेझॉनला यापुढे पारदर्शक कारभार ठेवण्याची ताकीद करण्यात आली असून त्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक नियंत्रकदेखील नेमला जाणार आहे. इटलीत सध्या गुगल, फेसबुक, ऍपल अशा दिग्गज कंपन्यांवरदेखील अशाच प्रकारचे आरोप असून त्याबाबत यंत्रणा चौकशी करत आहेत. आतापर्यंतचा सर्वोच्च दंड अमेझॉन कंपनीला ठोठावण्यात आलेला 130 कोटी डॉलरचा दंड हा आतापर्यंतचा सर्वोच्च दंड असल्याचं सांगितलं जात आहे. अर्थात, याविरोधात वरिष्ठ यंत्रणांकडे दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया कंपनीकडून देण्यात आली आहे. हे वाचा - Interesting! महागड्या हॉटेलात फुकट डेझर्टसाठी नाटक, कपलनं केली Engagement भारतातही तक्रारी थर्ड पार्टी सेलरकडून तरुणाला विष पुरवणं असो किंवा दहशतवाद्यांना बॉम्ब तयार करण्यासाठी कच्च्या मालाची डिलिव्हरी करणं असो; भारतातही अमेझॉनवर विविध आरोप करण्यात आले आहेत. व्यापारी संघटनांनी अमेझॉनविरोधात देशातील 500 जिल्ह्यांमध्ये आंदोलन करत कारवाईची मागणीदेखील केली होती. इटलीत झालेल्या या कारवाईनंतर आता भारतात अमेझॉनवर काय कारवाई होणार, याकडं सर्वाचं लक्ष आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या